-
बच्चन कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांच्याबद्दलही अनेक चर्चा सुरू होत्या.
-
गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र, नंतर अभिषेकने या गोष्टींना अफवा असल्याचे म्हटले.
-
दरम्यान, या सगळ्यामध्ये अभिषेकच्या ‘कॉफी विथ करण’ शोची एक क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप तेव्हाची आहे जेव्हा अभिषेक त्याची बहीण श्वेता बच्चनसोबत शोमध्ये आला होता.
-
या क्लिपमध्ये करण जोहर अभिषेकला आई जया बच्चनबद्दल कोणत्या गोष्टी आवडतात असे विचारताना दिसत आहे. या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक म्हणाला होता की, ती माझी आई आहे आणि मला आमचं हे नातं खूप आवडतं.
-
यानंतर करणने अभिषेकला विचारले की त्याला त्याच्या आईबद्दल काय गोष्टी नाही आवडतं आणि या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेकने सांगितले की, तिला कोणतीही गोष्ट सहजासहजी आवडत नाही आणि माला फक्त आईबद्दलची ही गोष्ट आवडत नाही.
-
त्याचवेळी, जेव्हा करणने अभिषेकला विचारले की त्याला त्याची पत्नी ऐश्वर्या आणि आई जया यांच्यामध्ये कोणाची जास्त भीती वाटते. या प्रश्नाला उत्तर देताना अभिषेकने आई जया बच्चन यांचे नाव घेतले.
-
मात्र, तिथे उपस्थित अभिषेकची बहीण श्वेता म्हणाली की नाही, तो ऐश्वर्याला जास्त घाबरतो. श्वेताने सांगितले की, अभिषेक त्याच्या आईबद्दल बोलण्यापूर्वी अजिबात विचार करत नाही, तर तो त्याच्या पत्नीबद्दल सर्व काही विचार करून बोलत आहे.
(फोटो स्रोत: अभिषेक बच्चन/इन्स्टाग्राम)
Photo: जया बच्चन यांच्या ‘या’ गोष्टींवर अभिषेकला आहे राग; मुलाखतीत आईबद्दल सांगत असताना केला खुलासा
कॉफी विथ करण या शोमध्ये अभिषेक बच्चनने जया बच्चन यांच्या काही सवयीं सांगितल्या ज्याचा अभिनेत्याला राग आहे.
Web Title: Photo abhishek is angry about jaya bachchan these things revealed while talking about mother in an interview arg 02