-
बिग बॉस ओटीटी सीझन-३ मधील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर शिवानी कुमारी सध्या चर्चेत आहे. बिग बॉस शो सोडल्यानंतर एकीकडे ती तिचे नवीन घर बनवताना दिसली तर आता शिवनीने नवीन कार देखील खरीदी केली आहे.
-
शिवानीने आपल्या सोशल मीडियावर नवीन कारचे फोटोही शेअर केले आहेत.
-
चाहत्यांनी हे फोटो पाहून तिला अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शिवानीने एक नवीन स्टायलिश आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कार खरेदी केली.
-
या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही कार जवळपास १३ लाख रुपयांची आहे.
-
शिवानीच्या या प्रवासाची सुरुवात सोपी नव्हती. शिवानीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ”जेव्हा गावकऱ्यांनी तिला व्हिडिओ बनवण्यास विरोध केला तेव्हा तिची आई रागाच्या भरात घरातून निघून गेली होती आणि ती रेल्वे स्टेशनवर राहू लागली”.
-
या कारणामुळे तिने वर्षभर व्हिडिओ बनवले नाही, पण घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तिने वर्षभरानंतर पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि आज ती एक प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर आहे.
-
(सर्व फोटो: शिवानी कुमारी/इन्स्टाग्राम)
-
(हे ही पाहा: Photos: ‘या’ अभिनेत्याने पहिल्या भूमिकेसाठी कमावले फक्त ५० रुपये, काही वर्षांनी एका टीव्ही शोमुळे घडलं आयुष्य; पाहा फोटो)
Photos: बिग बॉस ओटीटी फेम शिवानी कुमारीने खरेदी केली नवीन कार; सोशल मीडियावर चाहत्यांनी केले अभिनंदन; पाहा फोटो
बिग बॉस ओटीटी-३ मधील स्पर्धक शिवानी कुमारीने नवीन कार खरेदी केली आहे.
Web Title: Photos bigg boss ott fame shivani kumari bought a new car fans took to social media to congratulate see photo arg 02