-
मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव ही तिच्या कॉमेडीच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच हसवत असते.
-
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून ती आपल्याला पाहायला मिळते. नुकतेच या कार्यक्रमाने ८५० एपिसोड पूर्ण केले आहेत.
-
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर ही जोडी महाराष्ट्राला खळखळून हसवते.
-
याशिवाय नम्रता काही चित्रपटांमध्येही अभिनय करताना दिसते.
-
दरम्यान नम्रताचा काल २८ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता.
-
नम्रताला तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने भरभरून शुभेच्छा दिल्या.
-
त्या शुभेच्छांचा स्वीकार करून आज नम्रताने तिच्या सोशल मीडियावरून सर्वांचे आभार मानले आहेत.
-
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना तिने तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये खास असं कॅप्शन लिहिलं आहे.
-
नम्रताची पोस्ट
“मी खूप नशीबवान समजते स्वतःला, माझ्या आयुष्यात माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी माणसं आहेत. आपण कोणासाठी इतके स्पेशल आहोत हे वाढदवसाच्या दिवशी आणखी अधोरेखित होतं आणि मग अजून उत्साह वाढतो, ऊर्जा मिळते. वेळात वेळ काढून मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, स्टोरी टाकल्या, पोस्ट, मेसेज, कॉल केले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या. भरपूर गिफ्टस आले. असाच वर्षाव करा, प्रेमाचा आपुलकीचा. कारण, कौतुक प्रेम प्रत्येकाला हवं असत. आयुष्यात जगण्यात सुखाची आणि आनंदाची अधिक भर पडते, धन्यवाद.” -
(सर्व फोटो साभार: नम्रता योगेश संभेराव /इंस्टाग्राम पेज)
Photos : “…कारण, कौतुक प्रेम प्रत्येकाला हवं असत”, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून नम्रता आपल्याला पाहायला मिळते.
Web Title: Marathi actress namrata sambherao birthday and latest instagram post maharashtachi hasya jatra show spl