-
सध्या गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी अभिनेत्री लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री अमृता देशमुख हिची पहिली मंगळागौर पार पडली. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
-
अमृतानंतर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळेने लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली.
-
काही महिन्यांपूर्वी स्वरदाने सिद्धार्थ राऊत याच्याशी लग्नगाठ बांधली.
-
मोठ्या थाटामाटात स्वरदाचं लग्न पार पडलं होतं. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
-
नुकतीच स्वरदाची पहिली मंगळागौर पार पडली.
-
मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी स्वरदाने खास पारंपरिक लूक केला होता.
-
अभिनेत्रीने वेलवेट कलरची नऊवारी साडी नेसली होती. ज्यावर सुंदर असा हार आणि मोठं मंगळसूत्र घातलं होतं.
-
यावेळी स्वरदा मंगळागौरीचे खेळ खेळताना पाहायला मिळाली.
-
तसंच अभिनेत्रीने नवऱ्याबरोबर फुगडी देखील घातली.
-
स्वरदाच्या पहिल्या मंगळागौरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
दरम्यान, अभिनेत्रीचा नवरा सिद्धार्थ राऊत इंटिरियर डिझायनर आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – स्वरदा ठिगळे इन्स्टाग्राम
‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेतील अभिनेत्रीने लग्नानंतर साजरी केली पहिली मंगळागौर, नवऱ्याबरोबर घातली फुगडी अन्…; पाहा फोटो
अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमाचे फोटो पाहा
Web Title: Swarajya saudamini tararani fame actress swarda thigale first mangalagaur photos pps