बीअर बाइसेप्स युट्युब चॅनल हॅक, सर्व व्हिडिओ झाले डिलीट; याबाबत YouTuber रणवीर अलाहाबादिया काय म्हणाला? वाचा
Ranveer Allahbadia Beer Biceps Youtube Channel Hacked: चॅनल हॅक झाल्याबाबतची ही घटना अनेकांना खोटी वाटली किंवा ही एक पीआर स्ट्रॅटजी आहे असे देखील वाटले.
बुधवारी रात्री प्रख्यात युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन्ही युट्युब चॅनेल हॅक करण्यात आले. ‘बीयर बाइसेप्स’ म्हणून प्रसिद्ध असलेले यूट्यूब चॅनल हॅक करून त्याचे नाव बदलून “टेस्ला” ठेवण्यात आले आहे. सायबर क्रिमिनल्सनी दोन्ही चॅनेलवरील सर्व मुलाखती, पॉडकास्ट आणि सर्व कंटेंट डिलीट केलं आहे.
1/12
हॅकर्सनी रणवीरच्या युट्युब चॅनलवर इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या इव्हेंटमधील काही व्हिडिओ पोस्ट केले.
नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या युट्युब चॅनलसोबतही सायबर हल्ल्याची घटना घडली होती ज्यामुळे हाय-प्रोफाइल युट्युब चॅनलच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली होती.
2/12
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने वयाच्या २२ व्या वर्षी त्याचे पहिले यूट्यूब चॅनेल ‘बीअर बायसेप्स’ सुरू केले होते.
3/12
पुढे त्याने मोंक एंटरटेंमेंट कंपनीसह सात यूट्यूब चॅनल सुरू केले रणवीरच्या सर्व चॅनेलचे एकूण फॉलोअर्स हे १२ मिलियन आहेत. रणवीर हा मोंक एंटरटेंमेंट कंपनीचा सहमालक देखील आहे.
4/12
अनेकदा रणवीरचे पॉडकास्ट क्लिपस सोशल मीडियावर व्हायरल व्हायच्या, अनेक मोठ्या बॉलीवूड कलाकारांनी त्याच्या पॉडकास्ट मुलाखतींमध्ये हजेरी लावली आहे.
अनेकांना चॅनल हॅक झाल्याबाबतची ही घटना खोटी वाटली किंवा ही एक पीआर स्ट्रॅटजी आहे असे देखील वाटले. यावर प्रतिक्रिया देत रणवीरने ”नो जोक्स, नो पीआर. वर्किंग ऑन नेक्स्ट स्टेप्स. जस्ट फीलिंग काम राइट नाव. लाइफ ऑल्वेज शोज यू द नेक्स्ट डोरवे” (no jokes,no PR. working on next steps. just feeling calm right now. life always shows you the next doorway)अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली.
5/12
इन्स्टाग्रामवरील दुसऱ्या स्टोरीत युट्युब करिअर संपलं? असं ही त्याने लिहलं.
6/12
या घटनेमुळे रणवीर अलाहाबादियाबाबत अनेक चर्चा रंगत आहेत.