-
यंदा सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
-
सूरजच्या विजयानंतर सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
-
लहानशा मोढवे गावातून आलेल्या सूरजचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे शोमध्ये प्रत्येक सदस्याने त्याला खंबीर साथ दिली.
-
एवढंच नव्हे तर रितेश देशमुखने देखील त्याच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
-
Bigg Boss ची ट्रॉफी जिंकल्यावर सूरजने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्याने रितेशने दिलेल्या गिप्टबद्दल खुलासा केला.
-
आजवर सूरजची अनेकांनी फसवणूक केल्यामुळे रितेश आता, सूरजची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी त्याला पर्सनल मॅनेजर देणार आहे.
-
“रितेश सर म्हणाले, तुला एक मॅनेजर देतो. तो आमचाच मॅनेजर असल्याने तुला चांगलं समजून घेईल.” असं सूरजने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
-
जिनिलीयाबद्दल सांगताना सूरज म्हणाला, “ट्रॉफी जिंकल्यावर सर आणि वहिनी मला भेटले. वहिनी म्हणाल्या, तुम्ही लय भारी बोलता…सर्वांना खूप भारी हसवता”
-
तसेच आवडता हिरो रितेश देशमुख आणि आवडती अभिनेत्री जिनिलीया असल्याचं देखील सूरजने सर्वांना सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : सूरज चव्हाण व जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम )
“जिनिलीया वहिनी म्हणाल्या…”, सूरजने सांगितला Bigg Boss ची ट्रॉफी जिंकल्यानंतरचा किस्सा, रितेशने दिलं मोठं गिफ्ट
सूरजने सांगितलं Bigg Boss ची ट्रॉफी जिंकल्यावर रितेश देशमुख केली मोठी मदत! तर, जिनिलीयाबद्दल म्हणाला…
Web Title: Suraj chavan bigg boss marathi winner reveals genelia and riteish deshmukh gave him personal manager sva 00