-
टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका सीआयडी (CID) सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा नवीन सीझन नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांचा लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
सोनी टीव्हीने दुसऱ्या सीझनचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
ज्यामध्ये अभिजीत दयाला गोळी मारताना दिसत आहे. ज्यामध्ये तो स्वत: जखमीदेखील असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
आता प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “अखेरीस बालपण परत आलं”
-
दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “आणखी कोणते कलाकार असणार आहेत?”
-
सीआडीच्या पहिल्या सीझनमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. काही पात्रे प्रेक्षकांची विशेष लाडकी झाली. एसीपी प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, सीनियर इन्स्पेक्टर दया, पंकज, श्रेया, पूर्वी, डॉक्टर साळुंखे, डॉक्टर तारिका ही पात्रे प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत.
-
दिवंगत अभिनेते दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची साकारलेली भूमिका ही महत्त्वाची आणि विनोदी भूमिका होती, त्यांनी ती उत्तम साकारली होती. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर कलाकारांसह प्रेक्षकांनीदेखील हळहळ व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते.
-
आता पहिल्या सीझनमधील कोणते कलाकार पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (सर्व फोटो सौजन्य : सोनी टीव्ही इन्स्टाग्राम)
सहा वर्षांनंतर CIDचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला; नेटकरी म्हणाले, “बालपण परत आलं”
सहा वर्षांनंतर CID चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आता प्रेक्षक पहिल्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे.
Web Title: Cid popular television show return after 6 years sony tv shares on social media netizens reacted softnews nsp