-
Somebody Somewhere Season 3
२८ ऑक्टोबरपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणारी ही कॉमेडी ड्रामा सीरीज सॅम नावाच्या महिलेची कथा आहे. (Still From Film) -
Joker: Folie à Deux
२९ ऑक्टोबरपासून ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणारा हा चित्रपट २०१९ च्या ऑस्कर विजेत्या चित्रपट “जोकर” चा सिक्वेल आहे. (Still From Film) -
Anjaamai
एका माजी कलाकाराच्या संघर्षमय जीवनावर आधारित हा तमिळ चित्रपट २९ ऑक्टोबरला अहा तमिळवर पाहता येणार आहे. (Still From Film) -
Time Cut
टाइम ट्रॅव्हल आणि सायन्स फिक्शनवर आधारित हा हॉरर-सस्पेन्स चित्रपट ३० ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. (Still From Film) -
The Law According to Lidia Poët Season 2
इटलीच्या पहिल्या महिला वकिलाच्या कथेवर आधारित या सिरिजचा दुसरा सीझन ३० ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. (Still From Film) -
The Manhattan Alien Abduction
३० ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणारी डॉक्युमेंटरी एका महिलेच्या कथेवर आधारित आहे जी दावा करते की तिचे एलियन्सनी अपहरण केले होते. (Still From Film) -
The Diplomat: Season 2
पॉलिटिकल थ्रिलरने भरलेली ही सिरिज ३१ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (Still From Film) -
Wizards Beyond Waverly Place
३१ ऑक्टोबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर येणारी ही फँटसी सिरीज तुम्हाला जादूच्या दुनियेत घेऊन जाईल. (Still From Film) -
Thangalaan
साउथ स्टार चियान विक्रमचा हा चित्रपट कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्डमधील कामगारांच्या संघर्षाची कथा दाखवतो. ३१ ऑक्टोबरपासून Netflix वर उपलब्ध. (Still From Film) -
Murder Mindfully
एका माफिया वकिलाच्या कथेवर आधारित हा थ्रिलर चित्रपट ३१ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. (Still From Film) -
Lubber Pandhu
तामिळ स्पोर्ट्स ड्रामा फिल्म ‘लुबर पांधू’ ३१ ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Nikosh Chhaya
बंगाली वेब सिरीज ‘निकोश छाया’ ३१ ऑक्टोबरपासून होइचोईवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल. (Still From Film) -
Barbie Mysteries: The Great Horse Chase
मुलांसाठी आणि कुटुंबासाठी ही ॲनिमेटेड सिरीज १ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (Still From Film) -
Mithya: The Dark Chapter
हुमा कुरेशीची सायकॉलॉजिकल वेब सिरीज ‘मिथ्या: द डार्क चॅप्टर’ १ नोव्हेंबरपासून ZEE5 वर प्रसारित होणार आहे. (Still From Film) -
Kishkindha Kaandam
नवविवाहित जोडपे आणि वन अधिकारी यांच्याभोवती फिरणारा हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर १ नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. (Still From Film)
हेही पाहा – Photos : फटाक्यांची आतषबाजी पडली महागात; दिवाळीपूर्वी केरळमध्ये घडलेल्या दुर्घटनेत १५…
दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये तुमचं मनोरंजन करण्यासाठी ‘या’ १५ वेब सिरीज-चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत
Diwali OTT Releases: तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत मनोरंजनाच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या १५ नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची एक लांबलचक यादी घेऊन आलो आहोत. या आठवड्यात बरीच छान सामग्री रिलीज होत आहे ज्याचा तुम्ही घरी बसून आनंद घेऊ शकता.
Web Title: Mithya to joker2 thrillers fantasy comedy and horror new ott releases for diwali weekend watchlist spl