• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vijay varma shares fun bts moments from ic 814 spl

विजय वर्माने पोस्ट केले ‘IC 814’ सिरीजच्या सेटवरचे BTS फोटो, पाहा अभिनेत्याचा मजेदार अंदाज

IC 814 BTS photos : या सिरीजमध्ये विजय वर्मा शरण देव नावाच्या मुख्य पायलटची भूमिका साकारत आहे. ही वेब सिरीज १९९९ मध्ये झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित आहे.

November 10, 2024 19:16 IST
Follow Us
  • Rajeev Thakur hijacker role IC 814
    1/12

    बॉलीवूड अभिनेता विजय वर्माने अलीकडेच ‘IC 814: The Kandahar Hijack’ या सिरीजच्या शूटिंगदरम्यानचे काही मजेदार आणि हलके-फुलके BTS (पडद्यामागील) फोटो शेअर केले आहेत. या सिरीजमध्ये विजय वर्माने पायलटची भूमिका साकारली आहे.

  • 2/12

    विजय वर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये तो आपल्या सहकलाकारांसोबत सेटवर मस्ती करताना दिसत आहे.

  • 3/12

    या Netflix सिरीजचे दिग्दर्शन दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केले आहे, जी १९९९ मध्ये झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित आहे.

  • 4/12

    या सिरीजचा प्रीमियर २९ ऑगस्ट रोजी झाला आणि रिलीज झाल्यानंतर सिरीजला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. विजय वर्मा मुख्य पायलट शरण देव यांच्या भूमिकेत आहे.

  • 5/12

    या शोचे कथानक देवी शरण आणि श्रीनॉय चौधरी यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइट इन फियर’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे.

  • 6/12

    विजय वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर कॅप्शनसह लिहिले, “IC814 bts for your Sunday viewing”

  • 7/12

    या फोटोंमध्ये विजय आणि त्याचे सहकलाकार तणावपूर्ण दृश्यांच्या शूटिंगपूर्वी मजा करताना दिसत आहेत.

  • 8/12

    मालिकेत अपहरणकर्त्याची भूमिका करणारे विजय आणि राजीव ठाकूर कॅमेऱ्यासमोर मस्ती करताना दिसत आहेत.

  • 9/12

    विजयच्या पोस्टवर, मालिकेत दुसऱ्या पायलटची भूमिका साकारणारा अभिनेता आणि त्याचा सहकलाकार करण देसाईने कमेंट केली आहे, “What a lovely collection. A shoot and a time I shall cherish forever. Such a fantastic experience working you man, Big Thanks”

  • 10/12

    याशिवाय, विजय दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत सीनवर चर्चा करतानाही दिसत आहे. या फोटोमध्ये विजयने अनुभव सिन्हा यांच्या कपाळावर बनावट मिशा चिकटवलेल्या दिसत आहेत, हे फोटो सेटवरील हलके-फुलके वातावरण प्रतिबिंबित करत आहेत.

  • 11/12

    ‘IC 814: The Kandahar Hijack’ सिरीजचे एड्रियन लेव्ही, त्रिशांत श्रीवास्तव आणि अनुभव सिन्हा यांनी सह-लेखन केले आहे. यात विजय वर्मासह नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा, अरविंद स्वामी, कुमुद मिश्रा, दिव्येंदू भट्टाचार्य, मनोज पाहवा, आदित्य श्रीवास्तव, अमृता पुरी आणि स्क्विड गेममधील अनुपम त्रिपाठी यांसारख्या अनेक प्रमुख कलाकारांना भूमिका साकरल्या आहेत.

  • 12/12

    सिरीज रिलीजनंतर काही प्रेक्षक आणि समीक्षकांनी अपहरणकर्त्यांच्या खऱ्या नावांऐवजी कोड नेम वापरल्याबद्दल टीका केली. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हस्तक्षेप केला आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने खऱ्या नावांचा उल्लेख करणारं डिस्क्लेमर जोडले गेले. (Photos Source: @itsvijayvarma/instagram)
    हेही पाहा – Photos : ४४ वर्षीय ‘बेबो’चा हॉट अवतार; पती सैफ अली खानबरोबरचे सुट्टीमधील फोटो व्हायरल, नो मेकअप लूकचे चाहत्यांकडून कौतुक

TOPICS
नेटफ्लिक्सNetflixमनोरंजनEntertainment

Web Title: Vijay varma shares fun bts moments from ic 814 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.