-
मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकार मंडळींच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
अशातच आणखी एका अभिनेत्रीने लग्न झाल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे स्नेहा चव्हाण.
-
‘लाल इश्क’ या चित्रपटामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्नेहा चव्हाण दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे.
-
याचे फोटो अभिनेत्री व तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
स्नेहाचं पहिलं लग्न अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर झालं होतं. यानंतर काही वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यावर स्नेहाने नव्याने आयुष्य जगण्यास सुरुवात केली.
-
आता अभिनेत्रीचा विवाहसोहळा घरच्या घरी पार पडल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
लग्नानिमित्त अभिनेत्रीच्या घरात आकर्षक सजावट केली होती.
-
याशिवाय स्नेहा व तिच्या पतीने आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेडिंग केक सुद्धा कापला.
-
केक कापताना वेस्टर्न तर, लग्न लागताना स्नेहाने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. ( सर्व फोटो सौजन्य : स्नेहा चव्हाण इन्स्टाग्राम )
Photos : मराठी कलाविश्वातील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात; घरीच पार पडला लग्नसोहळा
मराठी इंडस्ट्रीमधल्या लोकप्रिय अभिनेत्रीने दुसऱ्यांदा केलं लग्न; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Web Title: Marathi actress sneha chavan tied knot for the second time wedding photos viral sva 00