-

अभिनेत्री रवीना टंडन हिने नुकतीच आपली मुलगी रशा थडानी हिच्यासोबत झारखंडमधील बैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले. या स्थळाला अभिनेत्रीने भेट देणे हा तिच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा एक भाग आहे.
-
दरम्यान, राशा थडानी अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने इन्स्टाग्रामवर त्यांच्या तीर्थयात्रेचे फोटोही पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये बैद्यनाथ मंदिराचे प्रसन्न सौंदर्य क्लिक केले आहे, या फोटोत आई-मुलगी दोघी शांतपणे बसून प्रार्थना करताना दिसताहेत.
-
या फोटोमध्ये दोघीही भव्य मंदिराच्या परिसरात श्रद्धेने तल्लीन झालेल्या दिसत आहे.
-
या फोटोत दोघीही गर्भगृहात प्रार्थनेत मग्न आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये राशाने लिहिले, ‘वैद्यनाथ बाबा बैद्यनाथ धाम #ज्योतिर्लिंग.”
-
बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाआधी रवीना आणि राशाने पुण्यातील भीमाशंकर मंदिर, नाशिक, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर शिव मंदिराची यात्रा केली आहे.
-
दरम्यान रवीना नुकतीच डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘पटना शुक्ला’ या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात रवीनासोबत सतीश कौशिक आणि मानव विजही आहे. ‘पटना शुक्ला’चे कथेचे खूप कौतुक झाले.
-
रवीना आगामी कॉमेडी-ड्रामा ‘वेलकम ३’ मध्ये देखील दिसणार आहे, जो ‘वेलकम’ फ्रँचायझीचा एक भाग आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पटानी, लारा दत्ता आणि परेश रावल यांच्यासह अनेक स्टार्स आहेत.
-
दरम्यान राशा थडानीही तिच्या आध्यात्मिक प्रवासाशिवाय ‘आझाद’ या पिरियड ड्रामामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्जआहे.
-
अजय देवगण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून, एका कुशल घोडेस्वाराची भूमिका साकारत आहे, त्याचा भाचा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. (Photos Source: Rasha Thadani/Instagram)
Photos : मुलगी राशाबरोबर रवीना टंडन करतेय १२ ज्योर्तिलिंगांची यात्रा, लेकीने शेअर केलेले फोटो व्हायरल
अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांनी नुकतेच झारखंडमधील बैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले, पहा फोटो.
Web Title: Bollywood actres raveena tandon visited baidyanath temple with daughter rasha spl