• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday badshah from engineering to rapping badshah educational journey spl

Badshah Birthday : रॅपर बादशाहचे खरे नाव माहितीय का? दिल्लीमधील ‘या’ शाळेत शिकला, इंजिनिअरिंगलाही घेतलेला प्रवेश

Badshah Education : बादशाहचा जन्म दिल्लीमध्ये झाला आणि त्याचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बादशाहचे खरे नाव फार कमी लोकांना माहीत आहे.

Updated: November 19, 2024 17:54 IST
Follow Us
  • Badshah early life and schooling
    1/12

    बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘डीजे वाले बाबू’, ‘गेंडा फूल’, ‘कर गई चुल’, ‘गरमी’ ही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठावर असतात. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 2/12

    आज १९ नोव्हेंबरला वाढदिवस साजरा करणाऱ्या बादशाहने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 3/12

    पण बादशाहचे खरे नाव काय आहे आणि त्याने शिक्षण कुठे घेतले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 4/12

    बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया आहे. त्याचा जन्म दिल्लीत झाला. त्याचे टोपणनाव राजकुमार आहे. त्याचे वडील हरियाणाचे तर आई पंजाबची आहे. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 5/12

    त्याने प्राथमिक शिक्षण बालभारती पब्लिक स्कूल, पीतमपुरा, दिल्ली येथून पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच बादशाह गायनाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असे. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 6/12

    शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला गणिताची आवड असल्याने त्याने कॉलेजमध्ये याच विषयात प्रवेश घेतला. मात्र, तो फार कमी दिवस कॉलेजला गेला आणि महिनाभरातच कॉलेज सोडले. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 7/12

    पण नंतर त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज (पीईसी), चंदीगड येथे सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. येथेच त्याला पंजाबी संगीत भेटले ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 8/12

    चंदीगडमध्ये राहून त्याने रॅप लिहायला सुरुवात केली आणि संगीतात करिअर करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत बादशाहने खुलासा केला होता की, जर तो रॅपर बनला नसता तर कदाचित आज तो आयएएस अधिकारी झाला असता. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 9/12

    पण त्याची संगीताची आवड इतकी खोलवर होती की त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून संगीतालाच आपले करिअर बनवले. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 10/12

    संगीत क्षेत्रात आल्यानंतर बादशाहने मागे वळून पाहिले नाही. त्याची गाणी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 11/12

    त्याच्या रॅप स्टाईलची आणि शब्दांची जादू अशी आहे की प्रत्येकजण त्याचा फॅन बनतो. (Photo Source: @badboyshah/instagram)

  • 12/12

    हेही पाहा- Photos : मुलगी राशाबरोबर रवीना टंडन करतेय १२ ज्योर्तिलिंगांची यात्रा, लेकीने शेअर केलेले फोटो व्हायरल

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Happy birthday badshah from engineering to rapping badshah educational journey spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.