-
मराठमोळी लोकप्रिय कलाकार आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही गेल्या दोन महिन्यापासून जास्त चर्चेत आहे.
-
तिचा फुलवंती हा मराठी चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.
-
प्रेक्षकांना भावलेल्या फुलवंतीचा डान्स ही बराच पॉप्युलर झाला.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने केलेल्या प्रमोशन्समध्ये प्राजक्ताच्या विविध बाजूही पाहायला मिळाल्या.
-
तिचे नृत्याप्रतीचे पॅशन तसेच तिच्या स्वप्नातली भूमिका म्हणजेच फुलवंती साकारण्यासाठी तिने घेतलेले कष्ट आणि मेहनत सुद्धा पाहायला मिळाली.
-
दरम्यान चित्रपटगृह गाजवल्यानंतर फुलवंती हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? याची प्रतीक्षा प्रेक्षक करतच होते.
-
अशातच प्राजक्ताने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे.
-
प्राजक्ताने निर्मिती केलेला फुलवंती चित्रपट ॲमेझॉन प्राईम या ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे.
-
परंतु हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकीट काढून पाहता येत होता, असं असताना देखील या चित्रपटाने संपूर्ण भारतात सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत, एवढच नाही तर हॉलिवूडचे चित्रपट तिथे असताना फुलवंतीला जास्त व्ह्यूज मिळाले, अशी माहिती प्राजक्ताने या व्हिडिओमध्ये दिली आहे.
-
या मराठी चित्रपटाने चक्क हॉलिवूड सिनेमालाही मागे टाकत रेकॉर्ड रचला आहे. प्राजक्ताने ही बातमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन प्रेक्षकांचे आभारही मानले. या चित्रपटात गश्मीर महाजनही मुख्य भूमिकेत आहे.
-
८ नोव्हेंबर पासून अमेझॉन प्राईमवर उपलब्ध झालेला चित्रपट आता मात्र २२ नोव्हेंबर पासून कोणत्याही सबस्क्रिप्शन शिवाय म्हणजेच ऑनलाइन तिकिटाशिवाय ज्यांच्याकडे प्राईम व्हिडिओचे सबस्क्रीप्शन आहे त्यांना पाहता येणार आहे.
-
त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्की पहावा असे आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून प्राजक्ताने केले आहे.
-
तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे, चित्रपटाचे संगीत असो किंवा चित्रपटातील प्राजक्ताच्या ठसकेबाज अदा असोत. तसेच कलाकार गश्मीर महाजनीचा अभिनय असो सर्वकाही प्रेक्षकांना आवडलं आहे.
-
दरम्यान, प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीव्ही कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे.
(सर्व फोटो साभार प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Prajakta Mali Phullwanti Movie OTT Release : प्राजक्ताने निर्मिती केलेला फुलवंती चित्रपट ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे.
Web Title: Prajakta mali phullwanti movie now available on amazon prime actress shared good news about film spl