-
गुरमीत चौधरी हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध स्टार आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि लोकांना त्याचा अभिनयही आवडतो. ‘रामायण’ या टीव्ही शोमधून गुरमीतला वेगळी ओळख मिळाली.
-
या शोमध्ये अभिनेत्याने प्रभू रामाची भूमिका साकारली होती. तर देबिना बॅनर्जीने शोमध्ये ‘सीता’ची भूमिका केली होती. या शोदरम्यान, अभिनेत्याने देबिनाबद्दल आपल्या मनापासून भावना व्यक्त केल्या आणि अलीकडेच त्याने सांगितले की दोघांनी त्यांच्या पालकांना न सांगता कसे गुपचूप लग्न केले.
-
इंस्टंट बॉलीवूडने गुरमीतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची प्रेमकथा सांगताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्याने सांगितले की, त्याने वयाच्या १९ व्या वर्षी देबिनाशी लग्न केले होते, या वयात आपल्या देशात कोणालाही लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्याचवेळी त्याने हा निर्णय का घेतला याचा खुलासाही केला.
-
गुरमीतने शेअर केले की, वयाच्या १९ व्या वर्षी माझे लग्न झाले. त्यावेळी देबिना साऊथच्या बड्या स्टार्ससोबत चित्रपट करत होती. त्यावेळी माझ्याकडे स्प्लेंडर बाईक होती, त्यात पेट्रोल भरायला पैसे नसायचे.
-
मग तिने चित्रपट साइन करायला सुरुवात केली आणि मला वाटले, अरे यार, आता ती मोठ्या स्टार्ससोबत शूटिंग करत आहे, कोणीतरी तिला तिथे पटवेन, लग्न होईल आणि मी असाच भटकत राहीन.
-
मग त्याने अभिनय करायला सुरुवात केली आणि एक दिवस त्याने देबिनाला कॉल केला आणि सांगितले की मी तुला खूप मिस करत आहे. त्यानंतर थोडं रडणं सुरू झालं आणि मग देबिना हळूच म्हणाली की मला तिथे येऊन तुझ्याशी लग्न करावं वाटतंय.
-
मी म्हणालो, हो आपण लग्न करु आणि हे कोणालाही कळू द्यायचं नाही, त्यावेळी मी १९ वर्षांचा असल्याने साहजीकच आमचे हे लग्न कोणालाच माहीत नव्हते, काही वर्षांनी आम्ही आमच्या आई-वडिलांना सांगितले की आमचे लग्न झाले आहे, पण तोपर्यंत स्प्लेंडरमधून मर्सिडीज आली होती.
-
(Photos Credit: Debinna Bonnerjee/Insta)
रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने प्रेयसीबरोबर गुपचूप उरकले होते लग्न, लव्हस्टोरी पाहून व्हाल थक्क
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक आहेत. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते, परंतु टीव्हीवरील मालिकेत रामाचे पात्र साकारणाऱ्या गुरमीतने वयाच्या १९ व्या वर्षी गुपचूप लग्न केल्याचे फार कमी लोकांना माहित असेल.
Web Title: Gurmeet choudhary had a secret wedding with debina bonnerjee against the law spl