-
उदित नारायण हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत. त्यांच्या आवाजात असा गोडवा आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाला भिडतो. एकीकडे त्यांची गाणी लोकांना मंत्रमुग्ध करत असतात तर दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक आयुष्यही काही कमी मनोरंजक नाही. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
फार कमी लोकांना माहित आहे की उदित नारायण यांनी दोनदा लग्न केले होते, जे त्यांनी अनेक वर्षे लपवून ठेवले होते. मात्र, हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर त्यांना दुसऱ्या लग्नाची गोष्ट जाहीरपणे स्वीकारावी लागली. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी बिहारच्या सुपौल जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव उदित नारायण झा आहे. ‘सिंदूर’ या नेपाळी चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. जवळपास दशकभर संघर्ष केल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘पापा कहते हैं बडा नाम करेंगे’ हे गाणे गाऊन त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर त्यांनी ‘उड जा काले कावा’, ‘पहेला नशा’, ‘मेरे सामने वाली खिरकी में’ अशी अनेक सुपरहिट गाणी गायली. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
हिंदी व्यतिरिक्त, चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकलेल्या उदित नारायण यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम, भोजपुरी आणि बंगाली अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.(Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
उदित नारायण गाण्यांच्या बाबतीत यशाच्या शिखरावर असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच वाद झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उदित यांनी १९८४ मध्ये बिहारमधील रंजना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. त्यावेळी ते इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत होते. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
मुंबईत आल्यानंतर त्यांची भेट दीपा गहतराज यांच्याशी झाली आणि दोघांनी १९८५ मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नापासून त्यांना आदित्य नारायण हा मुलगा आहे, जो स्वतः गायक आणि अभिनेता आहे. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
काही काळानंतर रंजनाला उदितच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. रंजनाने कोर्टात छायाचित्रे आणि कागदपत्रे सादर केली, ज्यावरून हे सिद्ध झाले की उदित यांनी पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केले होते. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
-
अखेर उदित यांनी रंजनाशी लग्न केल्याचे कोर्टात कबूल केले. उदित यांना त्याच्या दोन्ही पत्नींना सोबत ठेवावे लागेल, असा आदेश न्यायालयाने दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उदित नारायण यांच्या दोन पत्नी रंजना आणि दीपा यांच्यात सध्या कोणतेही मतभेद नाहीत. एका मुलाखतीत उदित म्हणाले होते की, दोघींमध्ये सर्व काही ठीक आहे. ते रंजनाला दर महिन्याला खर्च पाठवतात आणि त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. (Photo Source: @uditnarayanmusic/instagram)
हेही पाहा- Photos : काशी विश्वनाथ मंदिरात अभिनेत्री राशी खन्नाने साजरा केला वाढदिवस, भक्तीत झाली तल्लीन
उदित नारायण यांनी सर्वांपासून लपवलं होतं पहिलं लग्न, प्रकरण गेलेलं न्यायालयात, कोर्टानं आदेश दिल्यानंतर…
Udit Narayan Birthday: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी आपल्या मनमोहक आवाजाने आणि उत्कृष्ट गाण्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान तयार केले आहे. मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठा वाद न्यायालयात पोहोचला होता.
Web Title: Udit narayan birthday shocking truth behind udit narayan personal life you will not believe what happened when his secret come out spl