-
‘बिग बॉस OTT 2’ मध्ये दिसलेली बिहारची मनीषा राणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते आणि अनेकदा चर्चेत असते. तिच्या प्रोफेशनल लाईफशी संबंधित बातम्यांव्यतिरिक्त ती तिच्या फोटो आणि लूकमुळेही चर्चेत असते. दरम्यान, आता मनीषा पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे, या फोटोंमुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे. (Photo- Manisha Rani/Insta)
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधला मनीषाचा लूक पाहून लोकांचा विश्वास बसत नाही की फोटोमधली तीच व्यक्ती आहे. मनीषाचे ग्लॅमरस आणि बोल्ड लूक पाहून चाहते ‘आश्चर्यकारक’ ‘धक्कादायक’ अशा प्रतिक्रिया देत आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. (Photo- Manisha Rani/Insta)
-
मनिषा राणीने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. अभिनेत्रीने ओले केस आणि बॅकलेस शिमरी ड्रेससह लूक पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. (Photo- Manisha Rani/Insta)
-
फोटोंमध्ये मनीषा राणी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने लिहिले, ‘Ladies and gentlemen………Manisha Rani’ (Photo- Manisha Rani/Insta)
-
मनीषा राणीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. यावर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले तर एकाने लिहिले, “Omg kya ye Manisha rani hai?” दुसऱ्याने लिहिले, ‘Rani hotness overloaded.’ (Photo- Manisha Rani/Insta)
-
तिच्या फोटोंवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. तर ४ लाखांच्यावर लोकांनी तिचे हे फोटो लाईक केले आहेत. (Photo- Manisha Rani/Insta)
-
दरम्यान, मनीषा राणी केवळ तिच्या लूकमुळेच नाही तर तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. (Photo- Manisha Rani/Insta)
-
जिममधील वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमी शेअर करत असते. (Photo- Manisha Rani/Insta)
Photos : हिंदी बिग बॉसमधील अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव
Manisha Rani Sizzling Photoshoot: बिग बॉस ओटीटी फेम मनीषा राणीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही झलक दिखला जा जिंकल्यानंतर अभिनेत्री अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
Web Title: Big boss ott 2 manisha rani in latest sizzling photoshoot viral jhalak dikhhla jaa 11 winner new pics spl