Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tabla ustad zakir hussain passed away at 73 was also an excellent actor has received these award spl

उस्ताद झाकीर हुसेन उत्कृष्ट अभिनेतादेखील होते, ‘या’ चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला त्यांचा अप्रतिम अभिनय

Ustad Zakir Hussain Films and accolades: सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. झाकीर हुसेन हे चांगले अभिनेतेही होते. या वर्षी त्यांचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

Updated: December 16, 2024 12:48 IST
Follow Us
  • ustad Zakir Hussain
    1/9

    तबला जादूगार उस्ताद झाकीर हुसेन आता आपल्यात नाहीत. आता त्यांच्या तबल्याचा गोड सूर लोकांना ऐकायला मिळणार नाही. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे त्यांचा मृत्यू झाला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    तबला वादक असण्यासोबतच झाकीर हुसेन एक संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि एक चांगले अभिनेताही होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. याच वर्षी त्यांचा एक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर एक नजर टाकूया (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    हीट एंड डस्ट
    ब्रिटिश ऐतिहासिक रोमँटिक ड्रामा फिल्म ‘हीट अँड डस्ट’ १९८३ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये झाकीर हुसैन हे जमीनदार इंदर लालच्या भूमिकेत होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    द परफेक्ट मर्डर
    द परफेक्ट मर्डर १९८८ मध्ये रिलीज झाला होता. या गुप्तहेरावर आधारित चित्रपटात झाकीर हुसेनही दिसले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    साज
    झाकीर हुसैन १९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘साज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत शबाना आझमी आणि अरुणा इराणी दिसल्या होत्या. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    मंकी मॅन
    देव पटेल दिग्दर्शित मंकी मॅन हा चित्रपट याच वर्षी ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झाला ज्यामध्ये झाकीर हुसेन तबला वादकाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    या चित्रपटांशिवाय झाकीर हुसैन यांनी इतरही अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    पुरस्कार
    झाकीर हुसेन हे भारतातील महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत ज्यांना भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    याशिवाय ८ फेब्रुवारी २००९ रोजी त्यांना ५१ व्या ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी देश-विदेशातील अनेक मोठे पुरस्कार पटकावले आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
    हेही पाहा- ‘English Teacher’ ते ‘Yo Yo Honey Singh’ पर्यंत, या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर नवीन काय? जाणून घ्या

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tabla ustad zakir hussain passed away at 73 was also an excellent actor has received these award spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.