-
Keerthy Suresh Wedding: अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा गोव्यातील विवाह प्रियकर अँथनी थाटीलसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला. त्याचे अनेक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले.
-
ख्रिश्चन पद्धतीनुसारआता तिने सोशल मीडियावर तिच्या ख्रिश्चन पद्धतीनुसार केलेल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. होय, हिंदूनंतर आता कीर्ती सुरेशने अँथनी थाटीलशी ख्रिश्चन रितीरिवाजाने लग्न केले आहे.
-
हेही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ‘बेबी जॉन’ फेम अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.
-
लांब ओढणी असलेल्या अभिनेत्रीच्या गाऊनवर जाड धाग्यांनी काम केले आहे, जे चाहत्यांना खूप आवडले आहे. दरम्यान, अँथनी थाटील यानेही पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. काही फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे आणि एका फोटोमध्ये कपल लिप लॉक करतानाही दिसत आहे.
-
या जोडप्याचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले होते, ज्यामध्ये काही मित्र आणि जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. कीर्ती सुरेश आणि अँथनी थाटील गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
अँथनी मूळचा केरळमधील कोचीचा असला तरी त्याचा व्यवसाय दुबई, चेन्नई आणि कोची येथे चालतो. एकीकडे कीर्ती एक यशस्वी अभिनेत्री आहे, तर तिचा नवरा यशस्वी बिझनेसमन आहे.
-
दरम्यान, आता कीर्ती सुरेश वरुण धवनसोबत ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसणार आहे, जो २५ डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
-
(सर्व फोटो क्रेडिट: कीर्ती सुरेश/इन्स्टाग्राम)
Photos : अभिनेत्री कीर्ती सुरेशचे ख्रिश्चन पद्धतीनुसार पुन्हा एकदा लग्न; पती अँथनीबरोबर लिप-लॉक, फोटो व्हायरल
कीर्ती सुरेशने तिचा प्रियकर अँथनी थाटील याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि आता तिने तिच्या ख्रिश्चन पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिचा नवरा कोण आहे ते जाणून घ्या
Web Title: Keerthy suresh got married with anthony thattil in christian ceremony actress share liplock photos spl