• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. year ender 2024 worst rated movies of 2024 bade miyan chote miyan guntur kaaram yudhra auron mein kahan dum tha hrc

Year Ender: ‘या’ ९ चित्रपटांनी २०२४ मध्ये केली प्रेक्षकांची निराशा, मिळाले सर्वात वाईट रेटिंग

Worst-rated movies of 2024: या वर्षभरात प्रेक्षकांची व समीक्षकांची निराशा करणाऱ्या चित्रपटांची यादी!

Updated: December 17, 2024 16:46 IST
Follow Us
  • worst movies
    1/9

    2024 मध्ये काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असताना, अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केली. या चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खराब रेटिंग मिळाले आणि ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 2024 च्या सर्वात खराब रेटिंग मिळालेल्या 8 चित्रपटांची यादी पाहुयात. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 2/9

    बड़े मियां छोटे मियां
    अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या या मोठ्या ॲक्शनपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट समीक्षकांना आवडला नाही आणि बॉक्स ऑफिसवरही अपयशी ठरला. कथा आणि ॲक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांना भावले नाही. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 3/9

    मार्टिन
    मुख्य पात्राच्या सततच्या ओरडण्यामुळे आणि प्रचंड ड्रामामुळे चित्रपटावर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून टीका झाली होती. ( फोटो चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 4/9

    क्रॅक
    विद्युत जामवालचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट मानला जात होता. पण कमकुवत कथा आणि दिग्दर्शनामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खराब प्रतिक्रियाही मिळाल्या. (फोटो -चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 5/9

    गुंटूर कारम
    महेश बाबू आणि श्रीलीला स्टारर या चित्रपटात काही नवीन नव्हते. हा एक सामान्य दक्षिण मसाला मनोरंजनपट होता. प्रेक्षकांनी याला ‘जुनी कथा नव्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न’ असं म्हटलं होतं. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 6/9

    औरों में कहां दम था
    अजय देवगण आणि तब्बू अभिनीत हा रोमँटिक ड्रामा चित्रपट फारच कंटाळवाणा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली आणि प्रेक्षकांची निराशा केली. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 7/9

    इंडियन 2
    शंकर दिग्दर्शित आणि कमल हासन अभिनीत, या चित्रपटावर त्याच्या ‘मेडिकल मिरॅकल्स’ कथानकासाठी टीका झाली होती. प्रेक्षकांनी चित्रपटातील वर्णन अवास्तव असल्याची टीका केली होती. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 8/9

    युध्रा
    या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि राघव जुयालसारखे नवीन पिढीचे स्टार्स होते. पण चित्रपटाची कथा आणि संवाद प्रेक्षकांना भावले नाही आणि चित्रपट फ्लॉप झाला. ( फोटो- चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 9/9

    डबल इस्मार्ट
    राम पोथीनेनी, काव्या थापर आणि संजय दत्त अभिनीत या चित्रपटाचे कथानक ‘ब्रेन ट्रान्सफर’वर आधारित होते, पण प्रेक्षक आणि समीक्षकांना चित्रपट आवडला नाही. परिणामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Year ender 2024 worst rated movies of 2024 bade miyan chote miyan guntur kaaram yudhra auron mein kahan dum tha hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.