Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 10 shows to binge watch on netflix squid game mismatched black doves yeh kaali kaali ankhein hrc

वीकेंडचा प्लॅन नाही? पाहा नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग असलेल्या ‘या’ १० वेब सीरिज

नेटफ्लिक्सवर 2024 मध्ये अनेक उत्तम वेब सिरीज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकांमध्ये रोमान्स, थ्रिलर, ड्रामा आणि क्राइम अशा वेगवेगळ्या जॉनरचा समावेश आहे. आजकाल नेटफ्लिक्सवर ट्रेंडमध्ये असलेल्या 10 वेब सिरीजबद्दल जाणून घेऊया:

Updated: December 21, 2024 13:09 IST
Follow Us
  • Mismatched
    1/10

    Mismatched
    ‘मिसमॅच्ड’ ही एक हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा वेब सीरिज आहे. यात ऋषी आणि डिंपलची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ऋषी पारंपरिक आहे, तर डिंपल एक गेमर आहे. दोघांमधला एक रंजक आणि भावनिक प्रवास या सीरिजच्या तिन्ही सीझनमध्ये पाहायला मिळतो. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 2/10

    ला पाल्मा
    ‘ला पाल्मा’ ही कुंब्रे व्हिएजा त्सुनामी धोक्याच्या सिद्धांतावर आणि २०२१ च्या कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक यावर आधारित नेटफ्लिक्सवरील मिनीसीरीज आहे. या सीरिजमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यांचे परिणाम दाखवण्यात आले आहेत. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 3/10

    Yeh Kaali Kaali Ankhein
    ‘ये काली काली आंखे’ ही एक भारतीय रोमँटिक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 4/10

    द ग्रेट इंडियन कपिल शो
    ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा एक हिंदी भाषेतील कॉमेडी आणि टॉक शो आहे जो कपिल शर्मा होस्ट करतो. हा शो महिनाभर जागतिक स्तरावर ट्रेंड करत आहे.
    (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 5/10

    Black Doves
    ‘ब्लॅक डोव्हज’ ही ब्रिटिश स्पाय थ्रिलर मालिका मैत्री आणि त्यागाची गोष्ट आहे. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 6/10

    1992
    ‘1992’ ही एक रहस्यमय थ्रिलर आणि 1992 च्या सेव्हिल एक्स्पोशी संबंध असलेल्या सिरीयल किलरबद्दलची ड्रामा सीरिज आहे. या शोमध्ये एक महिला पतीच्या मृत्यूनंतर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 7/10

    When the Phone Rings
    ‘व्हेन द फोन रिंग्ज’ ही साउथ कोरियन टेलिव्हिजन मालिका आहे. यात एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे, जे तीन वर्षे न बोलता संसार करत असतात. पण अपहरणकर्त्याच्या एका धमकीच्या कॉलनंतर त्यांचे आयुष्य बदलते.

  • 8/10

    Khakee: The Bihar Chapter
    ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही एक भारतीय क्राइम थ्रिलर वेब सिरीज आहे, जी बिहारमधील शेखुपुरा आणि पाटणा जिल्ह्यात घडते. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 9/10

    IC 814: कंदहार हायजॅक
    ‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही 1999 च्या कंदहार अपहरणावर आधारित एक भारतीय हिंदी क्राइम थ्रिलर सीरिज आहे. त्या धोकादायक घटनेच्या वेळी भारत सरकारने कोणती पावले उचलली हे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

  • 10/10

    स्क्विड गेम
    ‘स्क्विड गेम’ हा साउथ कोरियन डिस्टोपियन सर्व्हायव्हल थ्रिलर आहे ज्यामध्ये 456 लोक त्यांच्या आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी धोकादायक खेळांमध्ये सहभागी होतात.
    (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformमनोरंजनEntertainment

Web Title: 10 shows to binge watch on netflix squid game mismatched black doves yeh kaali kaali ankhein hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.