• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. girls will be girls twisters pani zebra new movies web series released on ott this week hrc

या आठवड्यात OTT वर लोकप्रिय चित्रपट अन् वेब सीरिज प्रदर्शित, वाचा कलाकृतींची संपूर्ण यादी

जर तुम्हाला या आठवड्यात मनोरंजनासाठी काहीतरी नवीन पाहायचे असेल, तर OTT प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत. यात नाटक, ॲक्शन, कॉमेडी आणि डॉक्युमेंटरीचा समावेश आहे.

Updated: December 23, 2024 13:55 IST
Follow Us
  • Girls Will Be Girls
    1/15

    Girls Will Be Girls
    या चित्रपटाने दोन सनडान्स पुरस्कार जिंकले आहेत. यात मीरा नावाच्या किशोरवयीन मुलीची कथा सांगण्यात आली आहे. हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 2/15

    Twister
    ‘ट्विस्टर्स’, 1996 च्या क्लासिक चित्रपट ‘ट्विस्टर’चा सीक्वल 18 डिसेंबर रोजी JioCinema वर रिलीज झाला. चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 3/15

    English Teacher
    डिस्ने+ हॉटस्टार वर 18 डिसेंबर रोजी रिलीज झालेला हा अमेरिकन सिटकॉम आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 4/15

    Julia’s Stepping Stones
    नेटफ्लिक्सवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा लघुपट ऑस्कर विजेत्या चित्रपट निर्मात्या ज्युलिया रिक्टर यांचे जीवन आणि सामाजिक असमानतेवर आधारित त्यांचा संघर्ष दाखवतो. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 5/15

    Ronny Chieng: Love to Hate It
    कॉमेडियन रॉनी चेंगचा स्टँड-अप स्पेशल, ‘लव्ह टू हेट इट’ 18 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा शो त्याच्या शार्प ह्युमरने भरलेला आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 6/15

    Yo Yo Honey Singh: Famous
    प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगच्या जीवनावर आधारित ‘यो यो हनी सिंग: फेमस’ ही डॉक्युमेंटरी फिल्म 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटात हनी सिंगच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहे.
    (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 7/15

    The Six Triple Eight
    टायलर पेरी दिग्दर्शित हा अमेरिकन वॉर ड्रामा चित्रपट 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
    (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 8/15

    UniverXO Dabiz
    या डॉक्युमेंटरीमध्ये मिशेलिन-स्टार शेफ डॅबिझ मुनोझ यांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा शो खाद्यप्रेमींसाठी एक चांगली डॉक्युमेंटरी आहे.
    (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 9/15

    The Secret Lives of Animals
    Apple TV+ वर 20 डिसेंबर रोजी ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. यामध्ये कावळे आणि डॉल्फिन यांसारख्या प्राण्यांची वर्किंग स्टाइल दाखवण्यात आली आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 10/15

    Wizards Beyond Waverly Place
    डिस्ने+ हॉटस्टारवर 20 डिसेंबर रोजी ‘विझार्ड्स बियॉन्ड वेव्हरली प्लेस’ ही मालिका रिलीज झाली. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 11/15

    झेब्रा
    2024 चा तेलुगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘झेब्रा’ 20 डिसेंबर रोजी Aha वर रिलीज झाला आहे. हा चित्रपट मनोरंजक कथा आणि ॲक्शनने परिपूर्ण आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 12/15

    पानी
    मल्याळम चित्रपट ‘पानी’ 20 डिसेंबर रोजी सोनी LIV वर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावाची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 13/15

    थेल्मा
    या अमेरिकन कॉमेडी-ड्रामा चित्रपटात 93 वर्षांची आजी तिचे चोरलेले पैसे परत मिळवण्याच्या मिशनवर निघते ते दाखवण्यात आलं आहे. 21 डिसेंबर रोजी JioCinema वर प्रदर्शित झालेला हा चित्रपट, ॲक्शन पॅक्ड कॉमेडी ड्रामा आहे.(चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 14/15

    C.I.D 2
    टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’चा 21 डिसेंबरपासून सोनी टीव्ही आणि सोनीलिव्हवर सुरू झाली आहे. ही मालिका दर शुक्रवार आणि शनिवारी प्रसारित होईल. (फोटो – स्क्रीनशॉट)

  • 15/15

    What If…? Season 3
    मार्वलचा ॲनिमेटेड अँथॉलॉजी शो ‘व्हॉट इफ…?’ चा तिसरा सीझन 22 डिसेंबरपासून Disney+ Hotstar वर रिलीज झाला. या सीझनमध्ये हल्कची विचित्र मैत्री आणि कॅप्टन अमेरिकेच्या स्पेस मिशनसारख्या रोमांचक कथा पाहायला मिळतील. (फोटो- स्क्रीनशॉट)

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformमनोरंजनEntertainment

Web Title: Girls will be girls twisters pani zebra new movies web series released on ott this week hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.