-
बॉलिवूड अभिनेते त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट करतात. काही हिट तर काही फ्लॉप. आज आपण अशा एका अभिनेत्याबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने त्याच्या करिअरमध्ये १८० फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
-
पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहेत. १९७६ मध्ये ‘मृगया’ (Mrigayaa Film) या चित्रपटातून त्यांनी चित्रपट करिअरला सुरुवात केली. या चित्रपटासाठी मिथुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. -
मिथुन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम आहे, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारही मिळाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांचे बरेचसे चित्रपट फ्लॉपही ठरलेले आहेत.
-
रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांच्या करिअरमध्ये १८० चित्रपट फ्लॉप ठरले आहेत, त्यापैकी १३३ फ्लॉप तर ४७ सुपरफ्लॉप ठरेलेल आहेत.
-
सलग ३३ चित्रपट फ्लॉप झाले
एवढेच नाही तर २००० च्या सुरुवातीला मिथुन यांचे सलग ३३ चित्रपट फ्लॉप ठरले होते. मिथुन यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते की, मी ३७० चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी २०० चित्रपट मी अजून पाहिलेले नाहीत. -
यशस्वी अभिनेता कसे बनले?
आता तुम्ही विचार करत असाल की इतके चित्रपट फ्लॉप होऊनही मिथुन यशस्वी अभिनेते कसे बनले, तर त्यांच्या काही चित्रपटांनी चांगली कमाईही केली आहे. इंडस्ट्रीमध्ये १०० कोटींचे सिनेमेही त्यांनी दिले आहेत, तेही त्या जुन्या काळात जेव्हा असे करणे केवळ अशक्य होते. त्यांचा डिस्को डान्सर हा चित्रपट कमाईच्या बाबतीत अव्वल ठरला होता. सध्या मिथुन लक्झरी लाइफ जगतात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. तसेच त्यांच्याकडे आलिशान कारही आहेत. -
पहिले लग्न
मिथुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत होते. त्यांचा पहिला विवाह हेलेना ल्यूकशी झाला होता. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. -
मिथुन आणि योगिता
यानंतर मिथुन यांनी योगिता बालीसोबत लग्न केले आणि दोघांना मिमोह, नमाशी चक्रवर्ती, उष्मेया चक्रवर्ती आणि मुलगी दिशानी चक्रवर्ती अशी ४ मुलं आहेत. दिशानीला मिथुन यांनी दत्तक घेतलेले आहे. -
आगामी चित्रपट
मिथुन यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ते आता श्रीमान बनाम श्रीमती आणि प्रतीक्षा या चित्रपटात दिसणार आहेत. हेही पाहा- Photos : लाल बिकिनीत निक्की तांबोळीचे अरबाज पटेलबरोबर सेल्फी, दुबईतील व्हेकेशन फोटो व्हायरल
१०-२० नाही तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही अभिनेता बनला बॉलीवूडचा सुपरस्टार, जगतो आलिशान जीवन
आज आपण एका अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने त्याच्या करिअरमध्ये १०-२० नव्हे तर तब्बल १८० फ्लॉप चित्रपट दिले आहेत तरीही तो अभिनेता आज सामान्य माणूस नाही तर एक मोठा स्टारच आहे.
Web Title: Mithun chakraborty is a big superstar even giving 180 flop movies in his career spl