• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous bollywood actress mamta kulkarni takes sanyas became mahamandaleshwar at maha kumbh 2025 hrc

गळ्यात रुद्राक्ष माळ, भगवे वस्त्र केले परिधान; महाकुंभात अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, पाहा Photos

Mamta Kulkarni Maha Kumbh 2025: नुकतेच ममता कुलकर्णीने प्रयागराज महाकुंभमध्ये संन्यासाची दीक्षा घेतली, जिथे ती साध्वीच्या रूपात दिसली. गळ्यात रुद्राक्षाची माळ, खांद्यावर पिशवी आणि भगव्या रंगाचे कपडे घालून ममता कुलकर्णीने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Updated: January 25, 2025 12:02 IST
Follow Us
  • At Kumbh
    1/8

    ९० च्या दशकात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णी आता अध्यात्माकडे वळली आहे. चित्रपटसृष्टी सोडणाऱ्या ममता कुलकर्णीने प्रयागराजच्या महाकुंभ 2025 मध्ये संन्यासाची दीक्षा घेतली. ममता कुलकर्णीने संन्यास घेऊन किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर होण्याचा विधी पूर्ण केला.

  • 2/8

    महाकुंभात घेतली संन्यासाची दीक्षा
    ममता कुलकर्णी महाकुंभात भगव्या कपड्यात साध्वीच्या रुपात दिसत होती. गळ्यात रुद्राक्षाची माळ, खांद्यावर पिशवी आणि साध्वीचे पारंपरिक भगवे कपडे घालून तिने किन्नर आखाड्याच्या आध्यात्मिक परंपरांचे पालन केले. महाकुंभाच्या पवित्र कार्यक्रमात ममताने किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

  • 3/8

    ममताचे नवीन नाव काय?
    साध्वी झाल्यानंतर ममता कुलकर्णीला नवीन नाव देण्यात आलं आहे. ती आता ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. ममताला महामंडलेश्वरपदही देण्यात आले.

  • 4/8

    महाकुंभाच्या परंपरेनुसार, ममता कुलकर्णीने संन्यासाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली, त्यातील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे जीवित पिंड दान. संन्यास घेणाऱ्यांसाठी हा विधी महत्त्वाचा मानला जातो. याद्वारे मनुष्य सांसारिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होतो आणि आध्यात्मिक जीवन सुरू करतो.

  • 5/8

    महाकुंभातील आपला अनुभव सांगताना ममता कुलकर्णी म्हणाली, “महाकुंभला येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा कार्यक्रम दिव्यता आणि अध्यात्माचे प्रतीक आहे आणि त्याचा एक भाग होणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे.”

  • 6/8

    ममता कुलकर्णीने सुमारे एक तास आखाड्यात घालवला, ज्यामध्ये त्यांनी धर्म आणि अध्यात्माशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली. महाकुंभाची भव्यता आणि त्याचे गहन आध्यात्मिक महत्त्व याविषयी ममता म्हणाली, “हा कार्यक्रम भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रतिबिंबित करतो आणि आंतरिक शांतीचे माध्यम देखील आहे.”

  • 7/8

    बॉलीवूड ते अध्यात्माच्या वाटेवरचा प्रवास
    ममता कुलकर्णी ही ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. तिची ग्लॅमरस इमेज आणि हिट चित्रपटांमुळे तिला इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली. पण अचानक ती चित्रपटसृष्टीपासून दुरावली. अंडरवर्ल्डशी संबंधित काही प्रकरणंमध्येही ममताचे नाव चर्चेत होते.

  • 8/8

    आध्यात्मिक जीवनाची नवीन सुरुवात
    ममता कुलकर्णीचे हे पाऊल बॉलिवूडमध्येच नव्हे तर अध्यात्मिक विश्वातही चर्चेचा विषय ठरले आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमहाकुंभ मेळा २०२५Maha Kumbh Mela 2025

Web Title: Famous bollywood actress mamta kulkarni takes sanyas became mahamandaleshwar at maha kumbh 2025 hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.