-
‘स्टार प्रवाह’च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमुळे अभिनेता अभिषेक रहाळकर घराघरांत लोकप्रिय झाला.
-
अभिनेता वैयक्तिक आयुष्यात नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
-
सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील सुंदर असे फोटो शेअर करत अभिषेकने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
-
अभिषेकच्या पत्नीचं नाव कृतिका असं आहे. दोघांचा विवाहसोहळा नोंदणी पद्धतीने पार पडल्याचं अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
अभिषेक व कृतिका दोघंही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात.
-
लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत अभिनेत्याने बायकोबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिषेकने २०१५-२०२५ यापुढे इन्फिनिटी चिन्ह असं नमूद केलं आहे.
-
१० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर अभिषेक आणि कृतिका लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
-
अभिषेक आणि त्याच्या पत्नीने लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केला होता. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
याशिवाय अभिषेकबद्दल सांगायचं झालं, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘तू तेव्हा तशी’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘द केक’ या नाटकात काम करत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : fotocopy_vm व अभिषेक रहाळकर इन्स्टाग्राम )
१० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मराठी अभिनेता अडकला विवाहबंधनात! नोंदणी पद्धतीने केलं लग्न, फोटो आले समोर
२०१५ ते २०२५…; १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मराठी अभिनेत्याचा पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर…
Web Title: Marathi actor abhishek rahalkar tie knot with his girlfriend after 10 years of relationship sva 00