-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande) नुकतीच ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह अभिनेता गश्मीर महाजनी व सुरभी भोसले यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
-
आता मात्र मृण्मयी देशपांडे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने तिचा महिन्याचा खर्च किती असतो, हे सांगितले आहे.
-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्नील राव यांनी नुकताच आरपार या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधला. त्यावेळी मृण्मयीने म्हटले की, शेतामध्ये आल्यानंतर आमचा आठवड्याचा खर्च आहे, तो जवळजवळ ५००-६०० रुपये आहे.
-
महिन्यात आम्ही २००० रुपयांत आनंदात जगतो. गेल्या पाच वर्षांत मी वारंवार कपडे विकत घेतल्याचे मला आठवत नाही.
-
माझा वर्षाचा कपड्यांचा खर्च जवळजवळ २० हजार रुपये असेल. माझ्या प्रोफेशनला हा खर्च नगण्य आहे. त्याव्यतिरिक्त मला काही लागतच नाही, असे म्हणत अभिनेत्रीने तिचा महिन्याचा खर्च सांगितला आहे.
-
याबरोबरच, त्यांनी त्यांच्या शेतीविषयीदेखील माहिती दिली. एकाचवेळी ते विविध प्रकारची उत्पादने घेत असल्याचे म्हटले.
-
स्ट्रॉबेरीसह विविध इतर फळे, फळभाज्या, कांदा, झेंडू, माठ, लसून, मिरची अशी विविध उत्पादने घेत असल्याचे या जोडप्याने सांगितले. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच स्वप्नील वर्कशॉप घेत असल्याचे म्हटले.
-
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती व्हिडीओ शेअर करत असते. महाबळेश्वर येथे मृण्मयी व तिच्या पतीने सुंदर घर बांधले आहे. घराच्या आजूबाजूला त्यांची शेतजमीन आहे. या शेतातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.(सर्व फोटो सौजन्य: मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा महिन्याचा खर्च किती? म्हणाली, “आमचा आठवड्याचा…”
Mrunmayee Deshpande: लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेमकं काय म्हणाली? घ्या जाणून…
Web Title: Marathi actress mrunmayee deshpande reveals monthly expenses says we live happily on rs 2000 per month know details nsp