• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula shikvin changlach dhada fame shivani rangole shares 10th 12th percentage also shares her mother is teacher nsp

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेला १०-१२ वीला ‘इतकी’ होती टक्केवारी; खुलासा करत म्हणाली, “आई शिक्षिका…”

Shivani Rangole : मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणाली…

March 4, 2025 19:12 IST
Follow Us
  • Shivani Rangole
    1/9

    ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच अभिनेता हृषिकेश शेलार, लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर हे कलाकारही इतर प्रमुख भूमिकांत दिसत आहेत.

  • 3/9

    अक्षरा ही शाळेतील शिक्षिका असून, तिचे अशिक्षित असलेल्या अधिपतीबरोबर लग्न झाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले.

  • 4/9

    मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळेला दहावी व बारावीला किती मार्क्स होते माहीत आहे का?

  • 5/9

    अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि तिचा पती व अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी सर्व काही या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती.

  • 6/9

    यावेळी विराजस व शिवानीला एकमेकांबद्दल काही सलग प्रश्न विचारण्यात आले. यावेळी विराजसला शिवानीचे दहावी-बारावीचे गुण विचारण्यात आले. त्यावर विराजसने माहीत नसल्याचे सांगितले.

  • 7/9

    शिवानीने यावर बोलताना म्हटले , “मला दहावीला ९४ टक्के होते; पण बारावीला माझी मालिका चालू होती. मी प्रवासात वगैरे अभ्यास केला. मी आर्ट्सला होते. मला ७२ टक्के वगैरे असे मार्क्स होते.”

  • 8/9

    पुढे शिवानीने म्हटले, “आई शिक्षिका असून तिने मला स्पष्ट सांगितलेले की, स्पर्धा वगैरे करतेस ते सगळं ठीक आहे. पण, अभ्यास झालाच पाहिजे.”

  • 9/9

    विराजसनेदेखील तिचे पाठांतर चांगले असल्याचे म्हणत शिवानीचे कौतुक केले. (सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tula shikvin changlach dhada fame shivani rangole shares 10th 12th percentage also shares her mother is teacher nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.