• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. yuzvendra chahal dhanashree verma divorce these celebrity got separated in 2024 hrc

युजवेंद्र चहल-धनश्रीआधी गेल्या वर्षी ‘या’ सेलिब्रिटींचे मोडले संसार, कोणी २२ वर्षे तर कोणी ४ वर्षांत घेतला घटस्फोट

युजवेंद्र चहलपासून वेगळे झाल्यानंतर धनश्री वर्माला किती पैसे मिळतील? २०२४ मध्ये कोणत्या स्टार्सचा घटस्फोट झाला आहे? वाचा…

March 20, 2025 21:25 IST
Follow Us
  • Dhanashree Verma alimony amount
    1/10

    भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. आज त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले. (छायाचित्र: धनश्री वर्मा)/एफबी)

  • 2/10

    युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्याव्यतिरिक्त, गेल्या वर्षी वेगळे झालेले अनेक मोठे स्टार आहेत. चहलपासून वेगळे झाल्यानंतर धनश्रीला किती पैसे मिळतील आणि हे स्टार कोण आहेत ते जाणून घेऊया. (छायाचित्र: धनश्री वर्मा)/एफबी)

  • 3/10

    मीडिया रिपोर्ट्सनुसार,धनश्रीला चहलकडून ४.५ कोटी रुपयांची पोटगी मिळाली मिळणार आहे. यापैकी आतापर्यंत २.३७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. (छायाचित्र: धनश्री वर्मा)/एफबी)

  • 4/10

    ए आर रहमान-सायरा बानू
    २९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, ए.आर. रहमान आणि सायरा बानू यांनी गेल्या वर्षी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही नोव्हेंबर २०२४ मध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केली, मात्र त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला नाही. (छायाचित्र: ए.आर. रहमान/एफबी)

  • 5/10

    हार्दिक पांड्या-नताशा
    टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचाही गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये नताशा स्टॅन्कोविचशी घटस्फोट झाला. त्यांचे लग्न फक्त ४ वर्षे टिकले. (छायाचित्र: नतासा स्टॅन्कोविच/एफबी)

  • 6/10

    ईशा देओल-भरत तख्तानी
    बॉलिवूड अभिनेत्री आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा फेब्रुवारी २०२४ मध्ये घटस्फोट झाला. १२ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले. (छायाचित्र: ईशा देओल/इंस्टा)

  • 7/10

    सानिया मिर्झा-शोएब मलिक
    गेल्या वर्षी २१ जानेवारी रोजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसरं लग्न केलं. तेव्हा सानिया मिर्झा व शोएबचा घटस्फोट झाल्याचं समजलं. (@सानियामिर्झा/इंस्टा)

  • 8/10

    उर्मिला मातोंडकर-मोहसीन अख्तर
    बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने २०१६ मध्ये मोहसिन अख्तरशी लग्न केले. ८ वर्षांच्या लग्नानंतर २०२४ मध्ये अभिनेत्रीने मोहसिनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (छायाचित्र: उर्मिला मातोंडकर/इंस्टा)

  • 9/10

    जयम रवी-आरती
    २००९ मध्ये दक्षिणेतील अभिनेता जयम रवीने आरतीशी लग्न केले. पण २०२४ मध्ये दोघेही वेगळे झाले. (छायाचित्र: आरती रवी / इंस्टाग्राम)

  • 10/10

    धनुष-ऐश्वर्या
    दाक्षिणात्य मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये दोघांनीही चेन्नई फॅमिली कोर्टातून घटस्फोट घेतला. (फोटो: धनुष/इंस्टा)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentयुजवेंद्र चहलYuzvendra Chahal

Web Title: Yuzvendra chahal dhanashree verma divorce these celebrity got separated in 2024 hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.