-
अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यापैकी एक जोडी आहे.
-
अभिजीत आणि सुखदा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
-
सुखदाचा आज वाढदिवस असून तिच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने खास फोटो शेअर केले आहेत.
-
खास फोटोसह त्याने एका हिंदी गाण्याद्वारे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मैं अगर कहूँ तुमसा हसीन, कायनात में नहीं हैं कहीं”
-
तसंच यापुढे शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “तुझ्याबद्दल सगळं काही लिहिता येण अशक्य आहे. साथीदार, सखी, जोडीदार, टीकाकार. तू सगळंच आहेस.”
-
अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदाबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांचा प्रेमविवाह आहे.
(फोटो सौजन्य – अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम) -
एका फेसबुक मॅसेजमुळे त्यांच्या दोघांत मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि काही दिवसांच्या मैत्रीनंतर अभिजीतने सुखदाला लग्नासाठी विचारले.
“जोडीदार, टीकाकार अन्…”, बायकोसाठी अभिजीत खांडकेकरची खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला…
सुखदाच्या वाढदिवसानिमित्त अभिजीत खांडकेकरची खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला…
Web Title: Abhijeet khandkekar shared a special post for his wife sukhada birthday ssm 00