-
‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामध्ये ती ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
सायली-अर्जुनची जोडी महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. याशिवाय टीआरपीमध्ये सुद्धा ही मालिका आघाडीवर आहे.
-
मालिकेत अलीकडेच प्रेक्षकांना सायली-अर्जुनचा विवाहसोहळा पाहायला मिळाला.
-
‘ठरलं तर मग’ मालिका सुरू झाल्यापासून हे दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकले होते. पण, अखेरीस मोठ्या प्रतीक्षेनंतर अर्जुन-सायली एकमेकांसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करून विवाहबंधनात अडकले.
-
सायली आणि अर्जुनने सगळ्या सुभेदार कुटुंबीयांसमोर सात फेरे घेत नव्या आयुष्याची सुरुवात केल्याचा सीक्वेन्स मालिकेत पाहायला मिळाला होता.
-
या सगळ्यात चर्चेत आलं ते सायलीचं नवीन मंगळसूत्र.
-
आपल्या नवऱ्याशी दुसऱ्यांदा लग्न केल्यावर सायलीच्या मंगळसूत्राचं डिझाईन सुद्धा मालिकेत बदलण्यात आलं.
-
सायलीच्या नव्या मंगळसूत्राची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांना सायलीचं साधं अन् सुंदर मंगळसूत्र खूपच आवडलं आहे. ( फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम स्टोरी व oriolejwels)
-
सध्या सायलीच्या मंगळसूत्राचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून या मालिकेची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे हे स्पष्ट होतं. ( सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी व स्टार प्रवाह इन्स्टाग्राम )
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहक आनंदी! १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी