-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस आहे. यानिमित्ताने गायिकेने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
२०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. गेल्यावर्षी तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. आज कार्तिकीच्या लाडक्या लेकाचा पहिला वाढदिवस आहे.
-
कार्तिकी गायकवाडने पती अन् चिमुकल्या लेकासह खास फोटोशूट केलं आहे.
-
कार्तिकीने तिच्या बाळाचं नाव रिशांक असं ठेवलं आहे.
-
Introducing ‘रिशांक कार्तिकी रोनित पिसे’ असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या लेकाचं नाव आणि त्याचे गोंडस फोटो सर्व चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
रिशांकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्तिकी लिहिते, “माझ्या आयुष्याला पूर्णत्व देणाऱ्या माझ्या बाळाला रिशांकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”
-
“बाळा तुला उदंड आयुष्य, आरोग्य, आनंद लाभो आणि तुझ्याकडून देवाची, देशाची, धर्माची सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना” असं कार्तिकीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
कार्तिकीच्या चाहत्यांनी देखील रिशांकवर पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
अनेकांनी बाळ सेम टू सेम कार्तिकीसारखं दिसतंय असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : @studio__9_pune__ Bhosari, Pune आणि कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम )
“माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
कार्तिकी गायकवाडच्या मुलाचा पहिला वाढदिवस, गायिकेने लेकासाठी शेअर केली खास पोस्ट….
Web Title: Kartiki gaikwad baby boy first birthday singer writes special post for son sva 00