-
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेता प्रसाद लिमये त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
-
अभिनेत्याने लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
-
झी मराठी वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सर्व मालिकांतील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला, किशोर, दुर्गा, लक्ष्मी ही पात्रे साकारणाऱ्या अभिनेत्रीही हजर होत्या.
-
यावेळी प्रसाद लिमये मालिकेबाबत म्हणाला, “मला या मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या भरपूर शिव्या मिळाल्या. भरपूर अपमान केले गेले. पण, ही माझ्या कामाची पावती होती. माझ्या आईची ही इच्छा होती की, मी झी मराठी वाहिनीवर काम करावं. दुर्देवानं माझे आई-बाबा नाहीत.”
-
“जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हा जी पहिली मालिका केली, त्यामधील माझी आई म्हणजेच हर्षदाताई इथे बसली आहे. असे म्हणताना त्याने हर्षदा खानविलकर यांच्याकडे बोट दाखवले.
-
पुढे प्रसाद लिमयेने, “माझी आई नाहीये; पण ही आई बघत आहे की, मी हळूहळू कसा प्रवास करतोय आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. त्या काळत तिने मला जो हात दिला होता, त्यामुळे मी ही पायरी चढू शकलो”, असे वक्तव्य करीत हर्षदा खानविलकर यांचे कौतुक केले.
-
प्रसाद लिमये व हर्षदा खानविलकर यांनी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले आहे.
-
२०११ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेत रूपालीची भूमिका साकारणारी शर्मिला शिंदेदेखील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दुर्गाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
हर्षदा खानविलकर सध्या लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. या मालिकेत त्यांनी लक्ष्मी ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: प्रसाद लिमये इन्स्टाग्राम)
“माझी आई नाहीये; पण ही आई…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याबाबत म्हणाला…
Prasad Limaye Express Gratitude Harshada Khanvilkar: “त्या काळत तिने मला…”, ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याबाबत लोकप्रिय अभिनेत्याचे वक्तव्य; म्हणाला…
Web Title: Prasad limaye talks about harshada khanvilkar says unfortunately my parents are gone but this mother is watching how i am working nsp