-
झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jiv Rangala) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) सध्या चर्चेत आहे.
-
धनश्रीने या मालिकेत नंदिता गायकवाड उर्फ वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती.
-
या भूमिकेनं धनश्रीला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं.
-
दरम्यान धनश्रीने तिचे जूने फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
अभिनेत्रीने तिच्या जुन्या ड्रेसमधील ४ फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा एक नवा फोटोही आहे. हा तिचा २०१६ मधला फोटो आहे. जो तिने मुंबईतल्या बोरीवलीमध्ये काढला असल्याचे तिने म्हटले आहे.
-
तर हा २०१७ मधला आहे, या फोटोत ती त्याच ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो कोल्हापूरमध्ये क्लिक केला आहे.
-
हा २०२० मधला फोटो आहे यावेळीही धनश्रीने तोच ड्रेस परिधान केला आहे.
-
तर हा तिच्या २०२५ मधला नवा फोटो आहे ज्यामध्ये पुन्हा तिने जुना ड्रेस घातलेला आहे, यावेळी तिने तिच्या कॅप्शनमध्ये “Same dress but not same me, But loved every version of me” असं म्हटलं आहे.
-
तिच्या या पोस्टने सध्या सर्वांचं लश्र वेधून घेतलं आहे. (सर्व फोटो साभार- धनश्री काडगावकर-इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: मराठी अभिनेत्रीचं ‘ईश्श’ म्हणत घायाळ करणारं फोटोशूट, ‘या’ मालिकेत करते काम…
२०१६ मधला जुना ड्रेस परिधान करत धनश्री काडगावकरने व्यक्त केल्या भावना; ४ फोटो शेअर करत म्हणाली….
धनश्रीने या मालिकेत नंदिता गायकवाड उर्फ वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती.
Web Title: Tuzyat jiv rangala fame dhanshri kadgaonkar shares old photos with same dress spl