-
शूटिंगमधून ब्रेक घेत अथवा व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून अनेक सेलिब्रिटी बाहेर फिरायला जात असतात.
-
मराठीसह बॉलीवूड गाजवणाऱ्या छाया कदम या सुद्धा कान्सवरून परतल्यावर आपल्या गावी कोकणात गेल्या आहेत.
-
कोकण ट्रिपचे सुंदर फोटो छाया कदम यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
छाया कदम यांनी कोकणातील फोटो शेअर करत याला “Cannes to धामापूर” असं कॅप्शन दिलं आहे.
-
फणसाचे गरे, गावचं मंदिर, चुलीवरचं जेवण विशेषत: घावणे, कोकणातील निसर्गरम्य परिसर याची झलक छाया कदम यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्री या फोटोंमध्ये आपल्या कुटुंबीयांसह एकत्र एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
छाया कदम यांचं सर्वांशी मिळून मिसळून वागणं, कान्सवरून परतल्यावर आपल्या गावी भेट देणं, कान्समध्ये गावच्या मैत्रिणींनी दिलेली साडी नेसणं या गोष्टी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
-
छाया कदम यांच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
“तुमच्या साधेपणात सर्वकाही आलं…तुमच्यासारखी अभिनेत्री अलीकडच्या काळात पाहायला मिळत नाही”, “छाया.. परमेश्वर तुला सगळी सुखं भरभरून देईल”, “वा… थेट मालवण गाठलं याला म्हणतात down to earth” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सर्वत्र छाया कदम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : छाया कदम इन्स्टाग्राम )
चुलीवरचं जेवण, फणसाचे गरे अन्…; लोकप्रिय मराठी अभिनेत्री पोहोचल्या कोकणात, त्यांच्या साधेपणाचं होतंय कौतुक
कान्स To कोकण! मराठी अभिनेत्री पोहोचल्या गावी, शेअर केले सुंदर फोटो, नेटकऱ्यांना भावला त्यांचा साधेपणा…
Web Title: Marathi actress chhaya kadam kokan trip actress shares beautiful photos of hometown sva 00