-
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं नाव अनेक वेळा एकत्र घेतलं गेलं आहे. दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा सतत रंगतात, पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली नाही. मात्र, त्यांच्या भूतकाळातील एकत्रित भेटीगाठी आणि खास क्षणांनी हे नातं पुन्हा पुन्हा चर्चेत आलं आहे. अलीकडेच ‘कुबेरा’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात रश्मिकाने दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमुळे हे दोघं पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या फक्त अफवा आहेत की खरोखर काहीतरी खास सुरू आहे? वाचकांना आता आणखी उत्सुकता लागली आहे.
-
‘कुबेरा’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये रश्मिका मंदानाला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. इंडस्ट्रीतील कोणत्या कलाकारांचे असे खास गुण आहेत, जे तिला स्वतःमध्ये आणायला आवडतील?
नागार्जुनबद्दल बोलताना ती म्हणाली, “त्यांचा चार्म आणि आभा अप्रतिम आहे.”
धनुषच्या बाबतीत तिने दिलेलं उत्तर अधिकच प्रभावी होतं. “सरांकडे सर्व काही करण्याची ताकद आहे. संगीत, दिग्दर्शन, अभिनय, संगीत रचना… ते सगळंच!”
अल्लू अर्जुनच्या स्टाइलबद्दल विचारल्यावर रश्मिकाचं उत्तर होतं, “स्वॅग! मी तो नक्कीच कॉपी करू इच्छिते.” -
‘कुबेरा’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात वातावरण आधीच रंगात आलेलं होतं. त्यातच जेव्हा रश्मिकाला तिच्या कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्या उत्तराकडे लागलं होतं.
होस्टने विचारलं “विजयकडून तूला काय कॉपी करायला आवडेल?”
त्यावर रश्मिका हसत म्हणाली, “सर्वकाही! सर्वकाही कॉपी करेन.” -
‘कुबेरा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात रश्मिका मंदाना, नागार्जुन, धनुष आणि जिम सर्भ यांची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात धनुष एका अशा भिकाऱ्याची भूमिका साकारतो आहे, ज्याचं आयुष्य नागार्जुनच्या प्रभावशाली पात्राशी भेटल्यानंतर पूर्णतः बदलून जातं. हा भिकारी पुढे जाऊन भ्रष्ट राजकारणी आणि तेल साम्राज्यावर राज्य करणाऱ्या उद्योगपतींविरुद्ध बंड पुकारतो.
-
लोभ, पैसा आणि सत्ता यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या जगाची थरारक झलक दाखवणारा ‘कुबेरा’ हा चित्रपट एका अशा विश्वाची कहाणी सांगतो, जिथे नीतिमत्ता आणि हव्यास यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. तेलासाठी चाललेल्या जागतिक युद्धातून जन्मलेली ही कथा फक्त कारभाराची नाही, ती आहे मानवी भावनांची, बंडाची आणि परिवर्तनाची.
२० जून २०२५ रोजी ‘कुबेरा’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे.
सर्वकाही कॉपी करेन!’; रश्मिकाच्या या विधानामुळे विजयसोबतचं नातं पुन्हा चर्चेत
रश्मिका मंदान्ना | रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही बऱ्याच काळापासून डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या कुबेराच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात रश्मिकाने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Web Title: Rashmika vijay relationship back in news after copy everything comment svk 05