• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jungle silence and fear 11 thrilling films you must watch svk

जंगल, शांतता आणि अनामिक भीती: जंगलातील थरार अनुभवण्यासाठी हे ११ चित्रपट पाहा

जंगले, शेते आणि धुक्याच्या पर्वतांचे नैसर्गिक सौंदर्य खरोखरच आकर्षक आहे, परंतु जेव्हा काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात तेव्हा या ठिकाणांचे आकर्षण भीतीमध्ये बदलते. आम्ही तुमच्यासाठी अशा चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत जे तुम्हाला एका रोमांचक आणि भयानक प्रवासावर घेऊन जातील.

June 18, 2025 15:52 IST
Follow Us
  • Must-Watch Horror Films That Thrive on Isolation
    1/13

    तुम्हाला वाटतं जंगल म्हणजे शांततेचं दुसरं नाव? मग एकदा विचार करून पाहा. शांततेच्या त्या पडद्यामागे लपलेली खरी भीती काय असते.
    तिथे ना नेटवर्क असतं, ना वाय-फाय, ना आसपास कोणी माणूस. फक्त सळसळणारी पानं, थंड गार वारा आणि हरवलेल्या श्वासांची सावली.
    कल्पना करा तुम्ही एकटे ट्रेकिंग करत आहात आणि अचानक तुमच्या सभोवतालचं जग अंधाराने वेढलं जातं. आवाज थांबतात. वेळ थांबते.
    आता तुम्ही कुठे आहात? एका भुताटकी ऊसाच्या शेतात? की डोंगरांच्या कुशीत लपलेलं एखादं भयाण रहस्य तुम्हाला हेरतंय?
    ही केवळ साहसाची गोष्ट नाही. ही आहे तुमच्या धैर्याची अंतिम परीक्षा.

  • 2/13

    जंगलात एकदा हरवलं की ना मदत मिळते, ना साक्षीदार. म्हणूनच जंगलआधारित हॉरर चित्रपट भीतीचं खरं रूप दाखवतात.
    जर पुढच्या ट्रेकला निघण्याआधी तुमचं मन हादरवायचं असेल, तर हे ११ चित्रपट जरूर पाहा, कारण एकटं जंगल कधीच खरंच एकटं नसतं.

  • 3/13

    अँटीक्रिस्ट (2009) – इंग्रजी
    कोठे पहाल: Prime Video
    मुलाच्या मृत्यूनंतर दुःखात बुडालेलं जोडप. एका जंगलाच्या मध्यभागी असलेल्या केबिनमध्ये राहत असतं, पण त्या केबिनमध्ये त्यांना स्वतःच्या मनाचा अंधार सामोरा जातो. डार्क, disturb करणारा आर्ट-हॉरर अनुभव.

  • 4/13

    द ग्रीन इन्फर्नो (2013) – इंग्रजी
    कोठे पहाल: Prime Video
    अमेझॉनच्या जंगलात वाचवायला गेले, पण स्वतःच अडकले आणि झाले आदिवासींच्या क्रौर्याचे शिकार. रक्ताने माखलेला, अंगावर शहारे आणणारा हा एली रोथचा भयपट कविता आहे, जे कमजोर मनाचे आहेत ते नक्कीच नाही बघू शकत.

  • 5/13

    द रिचुअल (2017) – इंग्रजी
    कोठे पहाल: Netflix
    चार मित्र, एक हरवलेला मार्ग आणि स्वीडिश जंगलात लपलेलं प्राचीन भय. शॉर्टकटचा नवा मार्ग त्यांना एका नॉर्स दानवाच्या सावटात घेऊन जातो. थंड, गूढ आणि मन सुन्न करणारा हा हॉरर अनुभव नक्की चुकवू नका.

  • 6/13

    It Comes at Night (2017) – इंग्रजी
    कोठे पहाल: Prime Video
    साथीपासून वाचण्यासाठी जंगलात लपलेलं एक कुटुंब. पण, खरी भीती फक्त बाहेर नाही, ती त्यांच्या आत दडलेली असते. अनोळखी धोक्यांचं सावट आणि मनोविकृतीची सावध चाचपणी… हा पोस्ट-अपोकॅलिप्टिक थ्रिलर तुमच्या मनात खोलवर घर करून राहील.

  • 7/13

    Cargo (2017) – हिंदी
    कोठे पहाल: Netflix
    जंगल नसलं तरी हे अंतराळ यानही काही कमी एकाकी नाही. एकटेपणा, रहस्य आणि मानसिक ताण यांचा थरार अंतराळाच्या निर्वातात घुमतो. ही स्पेस-हॉरर कथा तुम्हाला जंगलासारखंच अडकवून ठेवते. श्वास घेण्यासाठी इथेही जागा नाही.

  • 8/13

    लपाछपी (2017) – मराठी
    कोठे पहाल: ZEE5
    ऊसाच्या शेतात लपलेलं भूतकाळाचं गूढ… एक गर्भवती महिला आणि तिच्या भोवती होणारी कुजबूज. ग्रामीण अंधश्रद्धा, सामाजिक दडपण आणि लोककथेची भीती यांचं धडकी भरवणारं मिश्रण ‘लपाछपी’ हा चित्रपट मनावर कायमची छाप सोडतो.

  • 9/13

    Nine (2019) – मल्याळम
    कोठे पहाल: JioCinema
    हिमालयाच्या दाट जंगलात एक वडील आणि मुलगा व त्यांच्यात घडणारा एक विचित्र, अवास्तव अनुभव.
    विज्ञान-कल्पना, मानसिक झपाटलेपणा आणि भावनिक गुंतवणूक यांचं विलक्षण मिश्रण ‘9’ हा केवळ भयपट नाही, तर एक अस्वस्थ करणारी मनोयात्रा आहे.

  • 10/13

    Alone (२०२०)’ – इंग्रजी
    कुठे पाहायचे: प्राइम व्हिडिओ
    एका अनोळखी जंगलात, स्वतःच्या भूतकाळापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणारी एक महिला अचानक एका जीवघेण्या खेळाच्या जाळ्यात अडकते. ‘Alone’ हा चित्रपट भीती, अनिश्चितता आणि मानसिक तणावाने भरलेला आहे. संपूर्ण कथा एका धक्कादायक थराराच्या भोवती फिरते, जिथे निसर्गाची शांततादेखील अस्वस्थ वाटू लागते. तुम्ही जर मनाला झपाटून टाकणारा आणि श्वास रोखून धरायला लावणारा भयपट शोधत असाल, तर ‘alone’ नक्कीच पाहावा.

  • 11/13

    ‘अश्विन्स’ (२०२३) – मल्याळम
    कुठे पाहायचे: नेटफ्लिक्स
    एक उत्साही YouTuber रहस्यमय आणि झपाटलेल्या व्हिलामध्ये दाखल होतो, अलौकिक घटनांचा मागोवा घेण्यासाठी. मात्र, त्याचा हा प्रयोग चुकतो आणि त्याचं संपूर्ण आयुष्य अंधारात अडकतं. ‘अश्विन्स’ हा चित्रपट पारंपरिक लोककथा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या धोक्याचं अनोखं मिश्रण सादर करतो. अल्गोरिदमच्या जगात दडलेल्या भीतीला भिडायचं असेल तर हा तमिळ भयपट तुमचं मन हेलावून टाकेल. रहस्य, धक्का आणि थरार यांचा अचूक मेळ असलेला हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

  • 12/13

    Knock at the Cabin’ (२०२३) –
    कुठे पाहावे: जिओ सिनेमा
    ‘Knock at the Cabin’ हा चित्रपट बायबलमधील भविष्यवाणी, मानसिक तणाव आणि मानवी नातेसंबंधांची कसोटी यांचं रोमांचकारी मिश्रण आहे. विश्वास, शंका आणि धक्कादायक वळणांनी भरलेला हा अनुभव तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. शेवटपर्यंत थरार टिकवणारा हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे.

  • 13/13

    ‘ब्रमयुगम’ (२०२४) –
    कुठे पाहायचे: सोनी लिव्ह
    जंगलाच्या गूढ शांततेत लपलेली एक जुनी हवेली… तिच्या भिंतीत बंदिस्त एक प्राचीन आणि अंगावर शहारे आणणारं रहस्य. ‘ब्रमयुगम’, हा काळ्या-पांढऱ्या छायाचित्रणात मांडलेला मल्याळम चित्रपट, भीती आणि अस्वस्थतेचं एक हळुवार पण प्रभावी चित्र उभं करतो.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Jungle silence and fear 11 thrilling films you must watch svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.