• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this weekend watch 2025 top 9 horror movies on ott svk

थरारक कथा, झपाटलेले क्षण : नक्की पाहा OTT वरील ‘हे’ ९ हॉरर चित्रपट

अल्टिमेट हॉरर वॉचलिस्ट: हे चित्रपट पाहिल्याने तुमचे हृदय जलद होईल आणि भीतीच्या सावलीत तुमची झोप उडेल. जर तुम्हाला सस्पेन्स आणि भीतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे चित्रपट पहायला विसरू नका.

Updated: June 20, 2025 16:10 IST
Follow Us
  • These 9 Chilling Movies on OTT Are Not for the Faint-Hearted
    1/10

    हॉरर चित्रपटांचे वेडे आहात? मग हे ९ नवे चित्रपट तुमच्यासाठी खास आहेत. भीती, गूढता व मानसिक थरार यांचं भन्नाट असे एकत्रित अनुभव देणारे हे चित्रपट तुमची झोप उडवतील. हिंमत असेल, तरच पाहा.  कारण- अनुभव जबरदस्त आहे.

  • 2/10

    Cuckoo (Netflix/ Prime Video)
    ‘Cuckoo’ हा एक थरारक चित्रपट आहे. एका मुलीची गोष्ट, जी आल्प्समध्ये तिच्या कुटुंबासोबत राहायला जाते. तिथे तिला विचित्र आवाज ऐकू येतात आणि एक रहस्यमय बाई भेटते. जिचा तिच्या भूतकाळाशी संबंध असतो. जसजसं गूढ उलगडत जातं, तसतशी भीती वाढत जाते.

  • 3/10

    In a Violent Nature ( Prime Video)
    ‘In a Violent Nature’ हा एक वेगळ्या ढंगाचा स्लॅशर चित्रपट आहे. जॉनी नावाचा एक मृत माणूस जंगलात लपलेलं लॉकेट शोधत कॅम्पर्सची हत्या करीत असतो. खुनी व्यक्तीच्या नजरेतून मांडलेली ही कथा, संथ; पण खिळवून ठेवणारी आहे, ज्यात भीती, तणाव आणि रक्तपात भरपूर आहे.

  • 4/10

    Longlegs (Amazon Prime Video)
    ‘Longlegs’ हा एक थरारक हॉरर चित्रपट आहे. एका एफबीआय एजंटची सीरियल किलरच्या केसमागची धडपड, तिच्या भूतकाळाशी जोडलेली भीतीदायक सत्ये उघड करते. संथ गती असली तरी शेवटी असा ट्विस्ट आहे की, ज्यामु

  • 5/10

    MaXXXine (prime video)
    ‘MaXXXine’ ही १९८० च्या हॉलीवूडमधील अभिनेत्री मॅक्सिन मिंकसची कथा आहे. भयानक घटनांतून वाचलेल्या मॅक्सिनसमोर आता एक नव्या सीरियल किलरचं आव्हान आहे. ग्लॅमर, रक्तपात आणि रहस्यांनी भरलेला हा चित्रपट ‘एक्स’ ट्रिलॉजीचा थरारक शेवट आहे.

  • 6/10

    Mickey’s Mouse Trap ( Amazon prime video)
    ‘Mickey’s Mouse Trap’ हा एक हटके हॉरर स्लॅशर चित्रपट आहे. मिकी माऊससारखा मुखवटा घातलेला खुनी, काही मित्रांना आर्केडमध्ये अडकवतो आणि एकेक करून त्यांची शिकार करतो. मजा करायला जमलेला वाढदिवस कसा रक्तरंजित थरारात बदलतो, याची ही धडकी भरवणारी कहाणी आहे.

  • 7/10

    Terrifier (Prime Video)
    ‘Terrifier’ हा एक जबरदस्त क्रूर स्लॅशर चित्रपट आहे. हॅलोविनच्या रात्री, ‘आर्ट’ नावाचा जोकर निष्पाप लोकांचा अमानुष खातमा करतो. कमी कथा, जास्त रक्तपात, अति हिंसक भयानक दृश्यं आवडणाऱ्यांसाठी हा चित्रपट खास आहे.

  • 8/10

    The Devil’s Bath (Prime Video)
    ‘The Devil’s Bath’ हा १८ व्या शतकातील ऑस्ट्रियामध्ये घडणारा एक गूढ मानसशास्त्रीय भयपट आहे. एका निराश महिलेची कथा, जी कठोर धार्मिक नियमांमध्ये अडकते आणि हळूहळू एका धोकादायक विधीचा भाग बनते. तिच्या मानसिक संघर्षातून उगम पावणारा हा चित्रपट थरारक आणि अंतर्मुख करणारा आहे.

  • 9/10

    The Exorcrism (Amazon prime video)
    ‘The Exorcrism’ मध्ये रसेल क्रो एका भयानक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अडकलेल्या अभिनेत्याची भूमिका करतो. सेटवर अजब गोष्टी घडू लागतात. तो फक्त अभिनय करतोय की खरोखर भूतबाधा झाली आहे? ही रहस्यमय आणि झपाटणारी गोष्ट आहे.

  • 10/10

    Watchers (Prime Video/ Netflix)
    ‘Watchers’ ही एक रहस्यमय हॉरर कथा आहे. एक कलाकार आयर्लंडच्या जंगलात अडकतो आणि एका विचित्र घरात पोहोचतो. जिथे एकच नियम आहे : “पहारेकऱ्यांनी तुम्हाला पाहू नये.” ते नेमकं काय आहेत, हे समजायला तुम्हाला हा थरारक प्रवास अनुभवावा लागेल.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: This weekend watch 2025 top 9 horror movies on ott svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.