-
महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी उत्तराखंडमधील पवित्र बद्रीनाथ धामला (Badrinath Dham) भेट दिली.
-
या अभिनेत्रींनी मंदिरासमोर अविस्मरणीय छायाचित्रे टिपली.
-
‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी’च्या सूरावटीत यात्रेकरूंनी काढले आकर्षक फोटो.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर बद्रीनाथ मंदिराच्या भव्य आणि रंगीबेरंगी वास्तूसमोर पोज देताना दिसत आहेत.
-
अमृता खानविलकर निळ्या रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत अत्यंत सुंदर दिसत आहेत; तर प्राजक्ता माळीही भारतीय पोशाखात मंदिराच्या पवित्र वातावरणात एकरूप झाल्याचे दिसून येते.
-
या यात्रेद्वारे या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून आध्यात्मिक शांतता अनुभवली आणि आपल्या चाहत्यांनाही धार्मिक स्थळांना भेट देण्याची प्रेरणा दिली आहे.
-
अलीकडेच प्राजक्ता माळी व अमृता खानविलकर यांनी भगवान शंकराचे निवासस्थान असलेल्या केदारनाथ धामाचे दर्शन घेतले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
बद्रीनाथ धाममध्ये प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांचा भक्तिमय अनुभव;
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी त्यांच्या बद्रिनाथ धामच्या आध्यात्मिक प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Marathi actress prajakta mali amruta khanvilkar badrinath dham photos viral svk 05