-
रविवार म्हणजे स्वतःसाठी वेळ. सिद्धांत चतुर्वेदीने त्याचा खास रविवार शेअर केला आहे. आईच्या प्रेमळ हातून केसांना तेल आणि टवटवीत डोक्याचा मसाज! आईच्या हाताची ही चंम्पी म्हणजे खरं सुख. (स्रोत: Instagram/@siddhantchaturvedi)
-
आईच्या हातचं खास तेल म्हणत सिद्धांत चतुर्वेदीची मजेशीर प्रतिक्रिया!
व्हिडीओमध्ये सिद्धांत त्याच्या आईला विचारतो, “या तेलात काय काय टाकलं आहे?”
आई उत्तर देते तीळ, नारळ, ऑलिव्ह तेल, मेथी, कॉफी, लवंग, कढीपत्ता, कोरफड, काळी मिरी, आले आणि तांदूळ!
हसत हसत तो म्हणतो, “पूरा किराणे का दुकान दाल दी हो क्या इसके अंदर?” (स्रोत: Instagram/@siddhantchaturvedi) -
भारतीय परंपरेनुसार केसांना तेल लावणं फार उपयुक्त मानलं जातं.
सिद्धांत चतुर्वेदी तर याला “नैसर्गिक बोटॉक्स” म्हणतो!
त्वचारोगतज्ज्ञही सांगतात की, योग्य प्रकारे केसांना तेल लावल्याने टाळू आणि केस निरोगी राहतात.(स्रोत: फ्रीपिक) -
मेथी आणि कोरफड केस गळती, कोंडा आणि कोरड्या टाळूवर उपयोगी ठरतात.
कढीपत्ता अँटी-बॅक्टेरियल असून टाळूच्या संसर्गाविरोधात लढतो.
हे घरगुती उपाय केसांना मजबुती देण्यासाठी खूप फायदेशीर आहेत! (स्रोत: फ्रीपिक) -
आवळा केस वाढवतो, टाळू थंड करतो आणि केसांना नैसर्गिक काळपट चमक देतो.
कॉफीमधील कॅफिन केसांच्या मुळांना सक्रिय करतं, टाळू स्वच्छ ठेवतं आणि केसांना अधिक चमकदार बनवतं. (स्रोत: फ्रीपिक) -
ही तेले केसांना आवश्यक ओलावा आणि पोषण देतात,
त्यामुळे केस मजबूत होतात आणि तुटणे कमी होते.
डोक्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे अधिक मजबूत होतात. (स्रोत: फ्रीपिक) -
केसांना तेल लावताना जास्त तेल टाळा फक्त थोडं तेल बोटांच्या टोकांनी टाळूमध्ये हलकं मालिश करा.
तेल काही तास राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवा.
यामुळे केस चांगले पोसले जातात आणि चिटचिटेपणाही राहत नाही.
‘मेरी माँ के 101 नुस्खे’: सिद्धांत चतुर्वेदीचा #NaturalBotox रविवार
"पुरा किराने का दुकां डाळ दी हो क्या इसके अंदर," सिद्धांत चतुर्वेदीने त्याच्या आईने केसांच्या तेलाच्या मिश्रणात टाकलेल्या घटकांची एक लांबलचक यादी सांगितल्यावर खिल्ली उडवली.
Web Title: Siddhant chaturvedi claims hair oiling to be naturalbotox 10082788 iehd import