• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. panchayat kota factory gullak aspirants watch this popular ott web series ssm

‘पंचायत’, ‘अ‍ॅस्पिरंट्स’ ते ‘गुल्लक’…; बघितल्याच पाहिजेत अशा ओटीटीवरील गाजलेल्या लोकप्रिय कलाकृती

ओटीटीवर गाजलेल्या ‘या’ लोकप्रिय सीरिज तुम्ही पाहिल्यात का? वाचा यादी…

Updated: June 24, 2025 20:02 IST
Follow Us
  • 'पंचायत' सीरिजमधलं फुलेरा गाव आणि त्या गावातली हटके मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या वेबसीरिजची चर्चा होती. आज (२४ जून) रोजी प्राइम व्हिडीओवर 'पंचायत'चा चौथा सीझन प्रदर्शित झाला. प्रधानजींपासून ते सचिवजींच्या कथांवर आधारित हा सीझन बेतलेला आहे.
    1/9

    ‘पंचायत’ सीरिजमधलं फुलेरा गाव आणि त्या गावातली हटके मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या वेबसीरिजची चर्चा होती. आज (२४ जून) रोजी प्राइम व्हिडीओवर ‘पंचायत’चा चौथा सीझन प्रदर्शित झाला. प्रधानजींपासून ते सचिवजींच्या कथांवर आधारित हा सीझन बेतलेला आहे.

  • 2/9

    ‘कोटा फॅक्टरी’ ही वेबसीरिज, राजस्थानमधील कोटा शहरात आयआयटीची (IIT) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. या सीरिजमध्ये, विद्यार्थ्यांवर येणारा अभ्यासाचा ताण, त्यांच्या अडचणी आणि कोचिंग क्लासेसमधील वातावरण दाखवले आहे. ‘जीतू भैया’ नावाचे एक लोकप्रिय पात्र या सीरिजमध्ये आहे, जो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.

  • 3/9

    ‘अ‍ॅस्पिरंट्स’ ही वेब सिरीज यूपीएससी (UPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. यात तीन मित्रांची कथा आहे, जे त्यांच्या स्वप्नांचा आणि ध्येयांचा पाठलाग करताना अनेक अडचणींना सामोरे जातात.

  • 4/9

    ‘गुल्लक’ ही एक लोकप्रिय सीरिज आहे. या सीरिजमधून मिश्रा कुटुंबाच्या आयुष्यातील लहान-मोठ्या घटना, त्यांचे नातेसंबंध आणि मध्यमवर्गीय जीवनातील आव्हाने विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. गुल्लकच्या माध्यमातून, आपण त्यांच्या घरात घडणाऱ्या गोष्टींचे साक्षीदार होतो. साध्या, पण हृदयस्पर्शी कथानकामुळे ही सीरिज खूप लोकप्रिय झाली.

  • 5/9

    ‘ये मेरी फॅमिली’ ही एक कौटुंबिक वेबसीरिज आहे. ९० च्या दशकातील कौटुंबिक जीवनावर आधारित ही सीरिज असून यात अवस्थी कुटुंबाची कथा सांगण्यात आली आहे. ऋषी नावाचा मुलगा आणि रितिका नावाच्या मुलगी आणि त्यांचे पालक संजय आणि नीरजा यांचा पालकत्वाच्या प्रवासाबद्दल या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

  • 6/9

    ‘फ्लेम्स’ या सीरिजची कथा शाळा आणि कोचिंग क्लासमधील मुलांच्या प्रेमावर आधारित आहे. द व्हायरल फिव्हर निर्मित या वेब सीरिजच्या तीनही सीझन्सना प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली. या सीरिजमध्ये रजत आणि इशिता हे मुख्य कलाकार त्यांच्या आयुष्यातील विविध आव्हानांना तोंड देताना दिसतात. या सीरिजचे तीन सीझन्स आले आहेत.

  • 7/9

    ‘सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड’ ही एक लोकप्रिय सीरिज आहे, यात अमृता सुभाष मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये सुमनच्या घटस्फोटानंतर ती तिच्या सासूबरोबर मिळून लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करते. यातून तिला स्वतःची ओळख मिळते आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहते.

  • 8/9

    ‘कॉलेज रोमान्स’ ही एक लोकप्रिय सीरिज आहे. ही सीरिज करण, बग्गा आणि राघव या तीन मित्रांची कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम आणि गैरसमजांवर आधारित आहे. ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेजचे दिवस नक्कीच आठवतील (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/9

    ‘हॉस्टेल डेझ’ या सीरिजमध्ये चार इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांची कहाणी पाहायला मिळते. महाविद्यालयीन जीवनातील अनेक मनोरंजक आणि भावनिक क्षण या सीरिजमधून पाहायला मिळतात. अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज पाहता येईल.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Panchayat kota factory gullak aspirants watch this popular ott web series ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.