-
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे नुकतीच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यासोबत ‘उमराव जान’ चित्रपटाच्या एका खास स्क्रीनिंगला पोहोचली होती.
-
अनन्याने या खास प्रसंगाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
अनन्या पांडेने पांढऱ्या रंगाचा फ्लोई अनारकली ड्रेस परिधान केला होता.
-
या पारंपरिक, पण आधुनिक अंदाजात अनन्या खूपच सुंदर दिसत होती. तिने मोठ्या आणि आकर्षक झुमक्यांनी आपला लूक पूर्ण केला होता.
-
अनन्या पांडेचा हा रेट्रो आणि पारंपरिक लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
अनारकली ड्रेस, तिचे मोठे झुमके आणि केसात लावलेले लाल गुलाब तिला एक खास आणि आकर्षक रूप देत होते.
-
तिने हलका मेकअप केला होता आणि कपाळावर छोटी टिकली लावली होती, ज्यामुळे तिचा लूक अधिक पारंपरिक आणि मोहक दिसत होता.
-
या पोस्टला अनन्याने ‘उमराव जान’मधील अजरामर गाणे “इन आखोकी मस्ती से” हे संगीत म्हणून जोडले आहे.
-
या पोस्टमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे अनन्याने रेखा यांच्यासोबतचा तिचा एक लहानपणीचा गोड फोटो शेअर केला आहे.
-
हा दुर्मीळ फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि रेखा व अनन्या यांच्यातील या जुन्या आणि खास नात्याबद्दल बोलत आहेत.
-
अनन्याने या फोटोंना एक खास कॅप्शन दिले आहे: “For Re aunty swipe to see how nothing has changed Umrao Jaan in theatres.
-
या पोस्टमुळे एका क्लासिक चित्रपटाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, तसेच दोन पिढ्यांच्या अभिनेत्रींमधील प्रेमळ नातेसंबंधाचे दर्शन घडले आहे.
-
(Photo Source: @ananyapanday/instagram)
Photos: रेखा यांच्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अनन्या पांडेचा अनारकली ड्रेसमध्ये मोहक लूक
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे ‘उमराव जान’च्या खास स्क्रीनिंगला रेखा यांच्यासोबत उपस्थित होती. अनन्याने पारंपरिक अनारकली ड्रेसमध्ये मोहक लूक सादर केला आणि लहानपणीचा रेखा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले.
Web Title: Bollywood actress ananya panday traditional look with rekha at umrao jaan screening svk 05