-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
“Blurring lines of day and night” असे कॅप्शन देत तमन्नाने तिचा एक बोल्ड आणि तितकाच ग्लॅमरस अवतार चाहत्यांसमोर आणला आहे.
-
या फोटोंमध्ये तमन्नाने काळ्या रंगाचा स्पोर्ट्स ब्रालेट, त्यावर पांढरा ट्रॅक जॅकेट आणि खाली सिल्व्हर आणि काळ्या रंगाच्या सिक्विन वर्क असलेला लाँग स्कर्ट परिधान केला आहे
-
हा स्कर्ट तिच्या प्रत्येक हालचालीसोबत चमकत आहे आणि तिच्या लूकला एक खास ग्लॅमरस टच देत आहे.
-
तिच्या या हटके स्टाइल स्टेटमेंटने नवा फॅशन ट्रेंड ठरत आहे.
-
तमन्नाचा मेकअप न्यूड टोन्समध्ये असून तिने केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
तिने विविध पोझेसमध्ये हे फोटो काढले आहेत, ज्यात तिचा आत्मविश्वास आणि स्टाइलची झलक स्पष्टपणे दिसते.
-
तमन्ना भाटिया केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.
-
ती नेहमीच नवनवीन फॅशन ट्रेंड्स ट्राय करत असते आणि तिच्या प्रत्येक लूकमधून एक वेगळी प्रेरणा मिळत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया/इन्स्टाग्राम)
Photos: स्पोर्ट्स ब्रालेट आणि सिक्विन स्कर्ट! तमन्ना भाटियाचा अनोखा ‘फ्युजन’ लूक व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असून तिने शेअर केलेला स्टायलिश अंदाज नवा फॅशन ट्रेंड ठरतो आहे.
Web Title: Actress tamannaah bhatia bold glamorous look photoshoot viral svk 05