-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अजय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या चित्रपटात त्यांच्या जीवनातील संघर्ष, तपस्या व राजकीय प्रवास उलगडून दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटानं आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. (छायाचित्र: अनंत जोशी/इंस्टा)
-
या चित्रपटाबाबत एक प्रश्न सर्वांना पडला आहे. योगींची भूमिका कोण करणार? प्रेक्षकांमध्ये सर्वांत जास्त उत्सुकता याच गोष्टीसाठी आहे. या बायोपिकमध्ये योगी आदित्यनाथ यांची भूमिका अभिनेता अनंत जोशी साकारणार आहे आणि त्याचा लूक पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. (छायाचित्र: चित्रपटाच्या टीझरमधून)
-
अनंत जोशी यानं योगींची भूमिका साकारताना स्वतःला त्या भूमिकेत संपूर्णपणे झोकून दिलं आहे. त्यानं योगी आदित्यनाथ यांच्यासारखा पोशाख, देहबोली व वावर आत्मसात केला आहे. त्याच्या लूकवरूनच हे लक्षात येतं की, त्यानं किती समर्पणाने तयारी केली आहे. (छायाचित्र: चित्रपटाच्या टीझरमधून)
-
योगींची भूमिका अचूक साकारण्यासाठी अनंत जोशी यांनी आपले केसही काढले आहेत. त्यानं केवळ दिसण्यातच नव्हे, तर जीवनशैलीतही योगींसारखा बदल केला आहे. त्याचं ते समर्पण पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. (छायाचित्र: चित्रपटाच्या टीझरमधून)
-
अजय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी हा चित्रपट येत्या १ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. योगींच्या जीवनातील अनकथित गोष्टी आणि अनंत जोशी याची दमदार भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (छायाचित्र: चित्रपटाच्या टीझरमधून)
-
अनंत विजय जोशी याचा जन्म १९८९ मध्ये आग्रामध्ये झाला. ३५ वर्षीय अनंत यानं २०११ मध्ये ‘वो पाँच दिन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. (छायाचित्र: चित्रपटाच्या टीझरमधून)
-
‘१२वी फेल’ या गाजलेल्या चित्रपटात अनंत जोशीनं विजय मेस्सीच्या मित्राची भूमिका साकारली होती. दिल्लीला घेऊन जाणारा आणि सिव्हिल सेवा परीक्षेसाठी प्रेरणा देणारा हाच अनंत प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. (छायाचित्र: अनंत जोशी/इंस्टा)
-
‘वो पाँच दिन’नंतर ‘मेरा राम खो गया’, ‘कोबाल्ट ब्ल्यू’, ‘कथल’, ‘ब्लॅकआउट’ अशा अनेक चित्रपटांत अनंतनं आपल्या अभिनयाची छाप सोडली. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणारा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. (फोटो: अनंत जोशी/इन्स्टा)
-
फक्त चित्रपट नाही, तर वेब सीरिजमध्येही अनंत जोशीनं आपली ओळख निर्माण केली आहे. ‘गंदी बात’, ‘व्हर्जिन भास्कर’, ‘पौरशपूर’, ‘ये काली काली आाँखे’ यांसारख्या सीरिजमधून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (छायाचित्र: चित्रपटाच्या टीझरमधून)
-
अनंत जोशी यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारत आहेत आणि त्यासाठी त्यानं स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “केस कापणं हे केवळ लूकसाठी नव्हतं, तर माझ्या आतल्या भागाचा त्याग होता. मला अभिनय करायचा नव्हता, मला योगींचं जीवन जगायचं होतं.”
त्याच्या म्हणण्यानुसार, ही भूमिका खऱ्या अर्थानं जगण्यासाठी त्याग आवश्यक होता आणि त्यानं तो मनापासून केला. (फोटो: अनंत जोशी/इंस्टा)
योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय त्यांची भूमिका…
योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या बायोपिकमध्ये अनंत जोशी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या पात्रासाठी त्यानं केवळ लूक नव्हे, तर जीवनशैलीही बदलली आहे. “मला अभिनय नाही, योगींचं जीवन जगायचं होतं,” असं तो म्हणतो. १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Title: Bollywood actor anant joshi as yogi adityanath in ajay untold story of a yogi svk 05