• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. television actress shefali jariwala death parag tyagi emotional post svk

“मी प्रत्येक जन्मात तुझ्यावर प्रेम करीन…” पराग त्यागीची शेफाली जरीवालासाठी खास पोस्ट

‘काँटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पती पराग त्यागीने शेफालीसोबतचे खास क्षण एका भावनिक व्हिडीओमध्ये साठवले आहेत. तिच्या निधनाआधीचे न शेअर केले गेलेले फोटो फोटोग्राफरने उघड करताच सोशल मीडियावर भावनांचा पूर उसळला.

July 6, 2025 18:23 IST
Follow Us
  • Shefali Zariwala photos
    1/8

    ‘काँटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. तिच्या अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (फोटो: पराग त्यागी/इंस्टाग्राम)

  • 2/8

    शेफालीचा पती अभिनेता पराग त्यागी याने त्यांच्या दोघांचे खास आणि याआधी कधीही न पाहिलेले फोटो एकत्र करून एक भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (छायाचित्र: पराग त्यागी/इंस्टाग्राम)

  • 3/8

    या व्हिडीओसोबत परागने एक प्रेमळ चिठ्ठीही लिहिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, “परी, तू पुन्हा जन्म घेईपर्यंत मी तुला शोधत राहीन आणि प्रत्येक जन्मात मी तुझ्यावर प्रेम करीत राहीन. मी तुला सदैव प्रेम करतो, मेरी गुंडी, मेरी चोकरी…” (छायाचित्र: पराग त्यागी/इन्स्टाग्राम)

  • 4/8

    काही दिवसांपूर्वीच छायाचित्रकार कुणाल वर्मा यांनी शेफालीच्या निधनाच्या काही दिवस आधी झालेल्या फोटोशूटमधील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)

  • 5/8

    फोटो शेअर करताना छायाचित्रकार कुणाल वर्मा म्हणाला, “ही पोस्ट मी नंतर शेअर करणार होतो. मी नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यात मागेच राहिलो आणि वेळेत काहीच शेअर करू शकलो नाही.” (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)

  • 6/8

    तो पुढे म्हणाला, “ती मला नेहमी विचारायची की, तू हे फोटो शेअर का करत नाहीस? किती छान निघाले आहेत ते.” (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)

  • 7/8


    या पोस्टच्या शेवटी कुणाल म्हणतो, “आम्ही अजून बरेच फोटो घेतले होते, जे कधीच शेअर झाले नाहीत. लवकरच ते सर्व फोटो मी शेअर करणार आहे. जे फोटो तिला खूप आवडले होते आणि जिच्यासाठी ती खूप उत्साहित होती.”(छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)

  • 8/8

    २७ जूनच्या रात्री शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागी याने घरी बेशुद्धावस्थेत पाहिले. तातडीने रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (छायाचित्र: कुणाल वर्मा/इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Television actress shefali jariwala death parag tyagi emotional post svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.