• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about bollywood actress education from alia bhatt to katrina svk

कोणी ग्रॅज्युएट तर कोणी ड्रॉपआउट; ‘या’ दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रींचं शिक्षण किती?

बॉलीवूडच्या झगमगाटात सौंदर्य, अभिनय आणि स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींचं शैक्षणिक चित्र वेगळंच आहे. काही जणींनी परदेशी विद्यापीठांतून पदवी मिळवली, तर काहींनी अभिनयाच्या आवडीतून शिक्षण अर्धवट सोडलं. दीपिका, आलिया, सारा, जान्हवीपासून ते शरवरी, तृप्ती, जॅकलिनपर्यंत जाणून घ्या या १० अभिनेत्रींचं शिक्षण आणि करिअर प्रवास!

July 8, 2025 16:58 IST
Follow Us
  • deepiks psdukon
    1/11

    बॉलीवूडच्या झगमगाटात आपल्या आवडत्या अभिनेत्रींचं सौंदर्य, अभिनय कौशल्य आणि स्टाईल यावर सर्वांचंच लक्ष असतं. मात्र, या ग्लॅमरच्या दुनियेत यश मिळवलेल्या अनेक अभिनेत्री शैक्षणिकदृष्ट्याही पुढारलेल्या आहेत. काही जणींनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय, तर काहींनी लवकरच करिअरला सुरुवात करत शिक्षण अर्धवट सोडलं. चला तर मग जाणून घेऊया या १० आघाडीच्या अभिनेत्रींचं शिक्षण आणि त्यांचा प्रवास.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 2/11

    सारा अली खान
    बॉलीवूडमधील सर्वाधिक शिक्षित अभिनेत्रींपैकी एक असलेली सारा हिने Columbia University, New York येथून History आणि Political Science या विषयात पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तिने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 3/11

    शरवरी वाघ
    शरवरीने मुंबईतील दादर पारसी यूथ्स असेंब्ली स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आणि रुपारेल कॉलेज, मुंबई येथून B.Sc. पदवी पूर्ण केली. अभिनयात येण्याआधी तिने ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्यार का पंचनामा २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. ‘बंटी और बबली २’ मधून तिने बॉलीवूड डेब्यू केला आणि अलीकडेच ‘मुनज्या’मध्ये तिचा अभिनय विशेष गाजला.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 4/11

    तृप्ती डिमरी
    दिल्ली युनिव्हर्सिटीमधून Psychology मध्ये पदवी घेतल्यानंतर तृप्तीने FTII पुणे मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. ‘बुलबूल’ आणि ‘कला’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी तिच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 5/11

    आलिया भट्ट
    मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून १२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आलिया भट्टने १९व्या वर्षीच ‘Student of the Year’ या चित्रपटातून डेब्यू केलं. अभिनयासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाच नाही. आज ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि पुरस्कारप्राप्त अभिनेत्रींपैकी एक आहे.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 6/11

    जान्हवी कपूर
    दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी हिने अमेरिकेतील Lee Strasberg Theatre and Film Institute मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. ‘धडक’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 7/11

    कतरीना कैफ
    कतरीनाचं बालपण विविध देशांमध्ये गेल्यामुळे तिने पारंपरिक शाळांऐवजी Home Schooling केलं. नंतर मॉडेलिंगमधून अभिनयात प्रवेश घेतला. ‘नमस्ते लंडन’, ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या हिट चित्रपटांनी तिला स्टारडम मिळवून दिलं.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 8/11

    अनन्या पांडे
    अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं. पुढे University of Southern California (USC) येथे शिक्षण घेण्याचा विचार होता, पण ‘Student of the Year २’ मुळे शिक्षण अर्धवट राहिलं. सोशल मीडियावर ती तरुणांची लाडकी स्टार आहे.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/11

    दीपिका पदुकोण
    बेंगळुरूमधील Sophia High School आणि पुढे Mount Carmel College येथून शिक्षण घेत असताना तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. नंतर IGNOU मधून Sociology मध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अभिनय कारकिर्दीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून तिचं बॉलीवूड पदार्पण झालं आणि ती लवकरच सुपरस्टार बनली.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 10/11

    जॅकलिन फर्नांडिस
    श्रीलंकेत जन्मलेली जॅकलिन फर्नांडिस हिने University of Sydney येथून Mass Communication मध्ये डिग्री मिळवली. ती मिस श्रीलंका राहिलेली असून ‘किक’, ‘हाऊसफुल’ यांसारख्या चित्रपटांनी बॉलीवूडमध्ये तिने तिचं स्थान पक्कं केलं.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 11/11

    सोनाक्षी सिन्हा
    सोनाक्षीने SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतली. नंतर ‘दबंग’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. तिचा अभिनय आणि स्टाईलसुद्धा विशेष लक्षवेधी ठरते.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Know about bollywood actress education from alia bhatt to katrina svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.