-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) नुकतेच कुटुंबाबरोबर आई तुळजाभवानीचे (Aai TuljaBhavani Temple) दर्शन घेतले.
-
धाराशिव जिल्ह्यात आई तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची (Maharashtra) कुलस्वामिनी आहे.
-
देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिर ओळखले जाते.
-
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून भाविक येत असतात.
-
देवीच्या दर्शनासाठी रेश्माने मोरपंखी रंगाची पैठणी साडी (Peacock Green Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर रेश्माने मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, नथ परिधान करत केसात गजरा माळला होता.
-
रेश्माने नेसलेली ही साडी तिला अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) यांनी भेट म्हणून दिली होती.
-
रेश्माने या फोटोंना ‘कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जगदंब’ असे कॅप्शन दिले आहे.
-
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रेश्माने पवनबरोबर (Pavan) लग्नगाठ बांधली.
-
रेश्मा सध्या स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
Photos: कुटुंबाबरोबर रेश्मा शिंदेने घेतले आई तुळजाभवानीचं दर्शन; फोटो शेअर करत म्हणाली…
देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिर ओळखले जाते.
Web Title: Marathi actress reshma shinde visited aai tuljabhavani temple dharashiv with family photos sdn