-

मनोरंजन विश्वात जिचं नाव होतं त्या सॅन रेचेलने झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करुन आयुष्य संपवलं आहे. तिला रुग्णालयात नेण्यात आलं पण काहीच उपयोग झाला नाही. (सर्व फोटो-सौजन्य-,सॅन रेचेल इन्स्टाग्राम पेज)
-
सॅन रेचेलने मिस पुद्दुचेरी हा किताब जिंकला होता. तिचं खरं नाव प्रिया होतं. ती लहान असतानाच तिची आई वारली. त्यानंतर वडिलांनी तिचा सांभाळ केला.
-
सॅन रेचेलच्या वडिलांनी तिला मॉडेलिंग कर असा सल्ला दिला. तिचा वर्ण सावळा असल्याने तिला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. मात्र या गोष्टीविरोधात तिने समर्थपणे लढा उभा केला.
-
सावळ्या त्वचेमुळे मॉडेलिंग करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तिने या सगळ्यावर मात करत लंडन, जर्मनी, फ्रान्स या ठिकाणी जाऊन मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
-
मी ऐश्वर्या रायला माझा आदर्श मानते असंही सॅन रेचेलने म्हटलं होतं. तिने आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त होते आहे.
-
महिला सुरक्षेसाठीही तिने मॉडेलिंगद्वारे जनजागृती केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती.
-
सॅनचं लग्न अलिकडेच झालं होतं. पण ती प्रचंड नैराश्यात होती. आर्थिक चणचण भासू लागल्याने तिने आत्महत्या केली. ती तिच्या वडिलांच्या घरी गेली असताना तिने झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन केलं. ज्यानंतर तिला रुग्णलयांमध्ये नेण्यात आलं पण तिची प्राणज्योत मालवली.
-
सॅनने आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आपल्या ठाम विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या सॅनने अशी आत्मसमर्पणाची भूमिका घेतल्याचं पाहून तिचे चाहते खूपच व्यथित झाले आहेत.
-
सॅनची सुसाईड नोट मिळाली आहे आणि माझ्या मृत्यूला कुणालाच जबाबदार धरु नका असं तिने म्हटलं आहे.
San Rechal : ऐश्वर्या रायला आदर्श मानणाऱ्या सॅन रेचेलने आयुष्याचा ‘असा’ शेवट का केला?
San Rechal : सॅन रेचेलने तिचं आय़ुष्य संपवलं आहे, आर्थिक चणचणीला वैतागून तिने टोकाचं पाऊल उचललं असं पोलिसांचं म्हणणं आहे.
Web Title: San rechal gandhi death miss puducherry suicide note said this thing why she chose the end scj