-
हॉलिवूडचा चित्रपट सुपरमॅन ११ जुलै रोजी भारतातील सिनेमगृहात प्रदर्शित झाला आहे. जेम्स गन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात डेव्हिड कोरेनस्वेट आणि रशेल ब्रॉसनाहन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात या दोघांमध्ये ३३ सेकंदांचा एक किस सीन देखील होता, जो सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने कापला आहे. या सीनची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. (Photo: YouTube/DC)
-
अभिनेत्री धन्वंतरीला हा सीन कापने बिलकूल आवडलेले नाही, तिने सीबीएफसी वर यावरून जोरदार टीका केली आहे. (फोटो सौजन्य- Instagram/@shreyadhan13)
-
सोशल मीडियावर पोस्ट करत तिने बोर्डाच्या निर्णयाला वेडेपणा म्हटले आहे आणि चित्रपटातून सेंशुअल सीन कापण्यावर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. (फोटो सौजन्य- Instagram/@shreyadhan13)
-
इन्स्टाग्रामवर शे्अर केलेल्या स्टोरीमध्ये ती म्हणली की, “हा काय मूर्खपणा आहे? त्यांची इच्छा आहे की आम्ही थिएटरमध्ये जावे. आम्ही पायरसी बंद करावी असे त्यांना वाटते. मला समजत नाही की मग ते थिएटरमध्ये जाण्याचा अनुभव इतका भयानक का बनवत आहेत? आम्हा सज्ञान लोकांसाठी तुम्ही निर्णय का घेत आहात? आम्हाला काय पहायचे आहे ते आम्हाला ठरवू द्या. आम्हाला आमच्या वेळेचे आणि पैशाचे काय करायचे आहे ते ठरवू द्या.” (फोटो सौजन्य- Instagram/@shreyadhan13)
-
श्रेया इथेच थांबली नाही. तिने पुढे लिहिले की, “हा कसला मूर्खपणा आहे. मग ते प्रेक्षकांना दोष देतात आणि म्हणतात की आम्ही सिनेमागृहात जात नाही. मग आश्चर्य व्यक्त करतात की लोक ओटीटी आणि टीव्हीवर अगदी सुमार काहीतरी पाहतात . कारण तुम्ही इतर पर्याय सहन न करणारे बनवत आहात. चित्रपट अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिनेमागृहात जाणे. तुम्ही तो खराब करत आहात आणि आम्हाला लहान मुलांसारखे वागवत आहात.” (फोटो सौजन्य- Instagram/@shreyadhan13)
-
केवळ श्रेया धन्वंतरीच नाही तर इतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही ‘सुपरमॅन’मधील किस सीन कापल्यावरून आक्षेप घेतला आहे आणि त्यावर टीका केली आहे. (फोटो सौजन्य- Instagram/@shreyadhan13)
-
श्रेया धन्वंतरी कोण आहे?
३६ वर्षीय श्रेया धनवंतरी ही हैदराबादमध्ये राहणारी एक अभिनेत्री असून तिने बॉलिवूड आणि साउथ चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटी वरील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘व्हाय चीट इंडिया’, ‘लूप लपेटा’ आणि ‘चुप: द रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ सारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘स्कॅम ९९२’ सारख्या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य- Instagram/@shreyadhan13)
Superman Kiss Scene Controversy : ‘सुपरमॅन’मधील ३३ सेकंदांचा किस सीन कापला, सेन्सॉर बोर्डावर चांगलीच संतापली अभिनेत्री
Superman kiss scene controversy | सुपरमॅन चित्रपटातील ३३ सेकंदांचा किसिंग सीन कापल्यावरून सेन्सॉर बोर्डावर चांगलीच टीका केली जात आहे.
Web Title: Actress shreya dhanwanthary slam cbfc for deleting 33 second kissing scene in superman rak