-
क्रिती सेनॉनच नाव काही काळापासून उद्योजक कबीर बहिया यांच्याशी जोडलं जात आहे. अनेकदा दोघं एकत्र दिसले असले तरी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी उघडपणे कधीच काही सांगितलं नाही. क्रितीनं अनेक वेळा स्वतःला अविवाहित असल्याचं म्हटलं. मात्र, आता हे नातं अधिकृत होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत.
-
भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी लॉर्डस मैदानावर अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. त्यात क्रिती सेनॉनही कबीर बहियासोबत सामना एन्जॉय करताना दिसली. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत.
-
कबीर बहियानं आपल्या इन्स्टाग्रामवर सामन्याचे काही क्षण शेअर करताना कृतीसोबतचा सेल्फीदेखील टाकला आहे. या फोटोमध्ये दोघंही खूप आनंदी दिसत असून, पार्श्वभूमीवर लॉर्डस ग्राउंडदेखील स्पष्ट दिसत आहे.
-
यापूर्वी क्रिती आणि कबीर अनेकदा एकत्र पाहिले गेले होते; पण त्यांनी कधीही नात्याबद्दल भाष्य केलं नव्हतं. मात्र, आता कबीरनं फोटो शेअर कीरत त्यांचं नातं अप्रत्यक्षपणे स्वीकारल्याचं स्पष्ट होत आहे.
-
क्रिती सेनॉन लवकरच झळकणार ‘तेरे इश्क में’मध्ये
क्रिती सेनॉन लवकरच आनंद एल. राय यांच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात धनुषसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
क्रिती सेनॉन आणि कबीर बहिया पुन्हा एकदा चर्चेत; लॉर्ड्सवरील फोटो व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि उद्योजक कबीर बहिया यांच्यातील नात्याची जोरदार चर्चा; लॉर्डस स्टेडियमवर सामन्यादरम्यान दोघेही एकत्र दिसले. कबीरने शेअर केलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली.
Web Title: Bollywood actress kriti sanon kabir bahia latest photo creates buzz at lords cricket ground svk 05