-
अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि तेलुगू अभिनेता सुमंत यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या फोटोमुळे दोघांच्या खास नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
सुमंत हे प्रसिद्ध अक्किनेनी परिवाराशी संबंधित असून, नागार्जुन यांचा तो पुतण्या आहे. त्यांनी याआधी अभिनेत्री कीर्ती रेड्डीसोबत लग्न केलं होतं; परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. (फोटो सौजन्य : सुमंत/ इंस्टाग्राम)
-
सध्या सुमंत सिनेसृष्टीपासून थोडा लांब आहे. मात्र, मृणाल ठाकूरने हिंदी आणि दक्षिणेतील सिनेमांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी बोललं गेलं आहे.
-
या फोटोमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहते दोघांना ‘नवीन कपल’ म्हणत शुभेच्छा देत आहेत. तर, काहींनी ‘फक्त फोटो असेल; अफवा नका पसरवू, असंही म्हटलं आहे.
-
सध्या दोघांनीही या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मृणालनं फोटो पोस्ट करीत, “आभार”, असं लिहिलेलं असून, ते कशासाठी हे स्पष्ट केलेलं नाही.
-
काही माध्यमांनी हा फोटो सुमंतच्या आगामी प्रोजेक्टशी संबंधित असू शकतो, असं सांगितलं आहे. त्यामुळे हे प्रोफेशनल शूट आहे की खरोखरच काहीतरी ‘स्पेशल’ आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
-
दोघांचं नातं खरोखरच फुलत आहे का? की हा केवळ एक गोड क्षण आहे? हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण, सध्या तरी मृणाल-सुमंतच्या फोटोमुळे इंटरनेटवर खूपच खळबळ उडाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर / इंस्टाग्राम)
तो फोटो आणि ती जवळीक… मृणाल ठाकूर आणि सुमंतच्या नात्यावर पुन्हा चर्चा
मृणाल ठाकूर आणि तेलुगू अभिनेता सुमंत यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.
Web Title: Actress mrunal thakur and sumanth kumar viral photo relationship rumors svk 05