-
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावतने सांगितले की, शाहरुख खानने दिलेला एक सल्ला तो आजही मनापासून जपतो. तो अनुभव त्याच्यासाठी अत्यंत मौल्यवान ठरला आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@jaideepahlawat)
-
जयदीपने शाहरुखला विचारले होते की, इतकी वर्षे लोकांचे प्रेम, ओढ आणि काही वेळा टीकाही कशी हाताळतोस? त्यावर शाहरुख म्हणाला, “मी काहीतरी वेगळं केलंय, म्हणूनच लोकांनी एवढ्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या.” (स्रोत: Instagram/@iamsrk)
-
शाहरुख पुढे म्हणाला, “जर मी काहीच वेगळं केलं नसतं, तर लोक माझ्यामागे आले नसते. त्यामुळे गोष्टी बिघडल्या, तर मी इतरांना दोष देऊ शकत नाही, ही माझीच जबाबदारी आहे.” (स्रोत: इंस्टाग्राम/@jaideepahlawat)
-
“अगदी मलाही कधी कधी लोकांवर राग येतो,” असं शाहरुख म्हणाला. “पण, मग मी स्वतःला थांबवतो. शेवटी ते ही माणसंच आहेत आणि माणसांकडून चुका होतातच.” (स्रोत: Instagram/@iamsrk)
-
कधी परिस्थिती राग आणणारी असते, निराशा येते, पण अशा वेळी दुसऱ्यांना दोष देण्याआधी स्वतःकडे पाहा, स्वतःचं वर्तन तपासा, असा सल्ला शाहरुखने दिला होता. (स्रोत: Instagram/@jaideepahlawat)
-
आपणास खटकणाऱ्या गोष्टी ओळखा, त्या टाळण्याचा मार्ग शोधा. ज्या गोष्टींमुळे समाधान मिळतं, त्यावर लक्ष केंद्रित करा. मनात कितीही राग असला तरी त्यामागेही एखादी शांतीची किनार लपलेली असते. (स्रोत: Instagram/@jaideepahlawat)
“कधी कधी मलाही राग येतो…” शाहरुखचा तो सल्ला जयदीप अजूनही विसरू शकत नाही
एका सल्ल्याने विचारांची दिशा बदलली… शाहरुख खानचं वर्तन आणि आत्मपरीक्षणाचं सांगणं आजही जयदीपच्या मनात ठसलेलं आहे.
Web Title: Bollywood famous actor shah rukh khan advice that jaideep ahlawat svk 05